सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क :- महाबळेश्वरच्या आंबेनळी घाटात पोलादपूर रस्त्यावर दाभेली खिंडी जवळ मिन बस खोल दरीत कोसळली आहे. तब्बल 200 फूट दरीत ही बस कोसळली आहे. यात 25 ते 33 प्रवासी अडकून पडले असल्याची प्राथमिक माहिती आहे.
या घाटात मोबाईलला नेटवर्क नसल्याने बसमध्ये असलेल्या कोणाशीही संपर्क होऊ शकत नाही आहे. त्यामुळे हा अपघात नेमका कसा झाला याबद्द्ल अद्याप कोणतीही माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली नाही. दरम्यान, पोलीसांची मोठी टीम हे सर्च ऑपरेशन करत आहे. त्यामुळे यात नेमके किती जण होते याबद्दलही काहीच माहिती अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही. दापोलीहून कृषी विद्यापीठाची बस घेऊन हे प्रवासी पर्यटनाला गेले असल्याचं सांगण्यात येत आहे. घाटातून जात असताना त्यांच्या बसला अपघात झाला आणि बस 200 फूट दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळतास पोलीस आणि रुग्णावाहीका त्याचबरोबर अग्निशमन दलाच्या गाड्याही घटवनास्थळी दाखल झाल्या आहे.
0 Comments