मलकापूर होणार नगरपरिषद, मुख्यमंञ्यांनी वचन पाळले :- अशोकराव थोरात - सत्य सह्याद्री

ठळक

Saturday, July 28, 2018

मलकापूर होणार नगरपरिषद, मुख्यमंञ्यांनी वचन पाळले :- अशोकराव थोरात

सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क

कराड :- कराड तालुक्यातील बहुचर्चीत मलकापूर नगरपंचायतीचा नगरपरिषद होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला.मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी मलकापूर नगरपंचायतीची नगरपरिषद करण्याचे दिलेले वचन पाळल्याची माहिती अशोकराव थोरात यांनी पञकार परिषदेत दिली.यावेळी विरोधी पक्षनेते हणमंतराव जाधव , माजी नगराध्यक्ष आबासो गावडे , चंद्रकांत लाखे , सुर्यकांत खिलारे , सागर निकम , भारत जंञे , अर्जून जगदाळे ,सुरज शेवाळे , अरुण यादव , संदिप पवार ,सागर शिंदे , शंकरराव साळुंखे , यांची प्रमुख उपस्थिती होती.


पञकार परिषदेमध्ये नगरपंचायती संदर्भात माहिती देताना थोरात म्हणाले कि, मलकापूर नगरपंचायतीची नगरपरिषद करावी यासाठी कराड दक्षिणचे युवा नेते ना.डाॅ.अतुल भोसले (बाबा)  यांनी गेल्या ३ वर्षामध्ये शासकीय तसेच मुख्यमंञी स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता. २९मे २०१७ रोजी मुख्यमंञी ना.देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मलकापूरची नगरपरिषद करण्याचे वचन शहरातील जनतेला दिले होते.  दि. २४/०७/२०१८ रोजी ना.डाॅ.अतुल भोसले (बाबा) यांनी मुख्यमंञ्यांना मुंबई येथे समक्ष भेटून नगरपरिषद होण्यासंदर्भात फेर विनंती पञ देऊन भेट घेतली . मुख्यमंञ्यांनी या मागणीचा विचार करुन मलकापूर शहरातील नागरिकांच्या भावनांचा व भाजपा कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद दिला.


ना.डाॅ.अतुल भोसले यांच्या भेटी दरम्यान ना.मुख्यमंञी साहेब म्हणाले की मेहरबान उच्च न्यायालयाच्या स्तरावर योग्य ती पूर्तता करुन प्रशासकीय पातळीवर नगरपरिषद होण्याची संपूर्ण अंमलबजावणी करु. मलकापूरचा विकास होण्यासाठी डाॅ.अतुल भोसले यांनी पुढाकार घेऊन विकासाचा आराखडा तयार करावा. मलकापूरसाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत व सहकार्य करेल असे आश्वासन मा.ना.देवेंद्र फडणवीस यांनी ना.डाॅ.अतुल भोसले यांना दिले आहे. मलकापूरची नगरपरिषद झालेनंतर शहरातील गावठाण ,शास्ञीनगर, आगाशिवनगर, सह संपुर्ण शहराच्या सर्वांगिण विकास करुन मलकापूर ही खर्‍या अर्थाने स्मार्ट सिटी करण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशिल राहू असे अशोकराव थोरात म्हणाले.

No comments:

Post a Comment