महाबळेश्वर येथील आंबेनळी अपघातातील 8 मृतदेह बाहेर काढले, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता - सत्य सह्याद्री

ठळक

Saturday, July 28, 2018

महाबळेश्वर येथील आंबेनळी अपघातातील 8 मृतदेह बाहेर काढले, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

सातारा : महाबळेश्वर येथील आंबेनळी घाटात एक खासगी बस 200 फूट दरीत कोसळली. या बसमध्ये कोकण कृषी विद्यापीठाचे 38 कर्मचारी आणि 2 चालक-वाहक असे एकूण 40 जण होते. आतापर्यंत आठ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. दरम्यान, बस अपघाताची माहिती मिळताच सर्व यंत्रणा आणि महाबळेश्वर ट्रेकर्स ग्रुप कर्मचाऱ्यांच्या बचावासाठी पोलादपूरला रवाना झाले आहेत. स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरु आहे.

वरिष्ठ कृषी अधिकारी संजय भावे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिन्याचा चौथा शनिवार आणि रविवार अशी सलग सुट्टी आल्याने कर्मचारी दापोलीहून महाबळेश्वरला पिकनिकला निघाले होते. यासाठी त्यांनी विद्यापीठाचीच बस भाड्याने घेतली होती. परंतु बस रायगडमधील पोलादपूर घाटात आल्यावर दरीत कोसळली. दरवर्षी भाताची लावणी झाल्यानंतर कृषी विद्यापीठातील कर्मचारी पिकनिकला जातात. त्याप्रमाणे हे कर्मचारी आज सकाळी साडेसहाच्या सुमारास दापोलीहून महाळेश्वरला जाण्यासाठी निघाले. परंतु साडेदहा वाजता कर्मचाऱ्यांची बस दरीत कोसळल्याचा फोन आम्हाला आला. बसमध्ये 38 कर्मचारी होते, त्यात महिला कर्मचारी नव्हत्या.


No comments:

Post a Comment