पोलादपूर येथील बस अपघातात 33 जणांचा मृत्यू, 1 जण बचावला - सत्य सह्याद्री

ठळक

Saturday, July 28, 2018

पोलादपूर येथील बस अपघातात 33 जणांचा मृत्यू, 1 जण बचावला

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क :-पोलादपूर जवळ  आंबेनळी घाटात एक खासगी बस 200 फूट दरीत कोसळून आत्तापर्यंत 34 पैकी 33 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. बसमधून एकाने उडी मारल्याने त्याचे प्राण वाचले. आत्तापर्यंत 16 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात बचाव दलाला यश आलं आहे. या बसमध्ये कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी आणि चालक-वाहक असे एकूण 34 जण होते. महिन्याचा चौथा शनिवार आणि रविवार अशी सलग सुट्टी आल्याने कर्मचारी महाबळेश्वरला पिकनिकला निघाले होते. यासाठी त्यांनी विद्यापीठाचीच बस भाड्याने घेतली होती. परंतु बस रायगडमधील पोलादपूर घाटात आल्यावर दरीत कोसळली.


आंबेनळी घाटामध्ये धुकं मोठ्या प्रमाणावर असल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत. बस अपघाताची माहिती मिळताच सर्व यंत्रणा आणि महाबळेश्वर ट्रेकर्स ग्रुप कर्मचाऱ्यांच्या बचावासाठी पोलादपूरला रवाना झाले आहेत.

No comments:

Post a Comment