पोलादपूर येथील बस अपघातस्थळाच्या पाहणीसाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत सांगलीहून रवाना (पहा व्हिडिओ) - सत्य सह्याद्री

ठळक

Saturday, July 28, 2018

पोलादपूर येथील बस अपघातस्थळाच्या पाहणीसाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत सांगलीहून रवाना (पहा व्हिडिओ)



सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क:- रायगडमध्ये पोलादपूर - महाबळेश्वर महामार्गावर पोलादपूर जवळ आंबेळनेरी चिरेखिंड घाटामध्ये रायगड हद्दीमध्ये हा अपघात झाला आहे. आत्तापर्यंत 34 पैकी 33 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातातून एक कर्मचारी आश्चर्यकारकरित्या बचावला. हा कर्मचारी कसाबसा दरीतून आला. वर आल्यानंतर रस्त्यावर त्याच्या मोबाईलला रेंज आली, त्यानंतर त्याने सर्वात आधी या अपघाताची माहिती कोकण कृषी विद्यापीठाला कळवली. आमची बस दरीत कोसळली, आम्हाला मदत करा, अशी माहिती प्रकाश सावंत-देसाई या कर्माचाऱ्याने दिली. अपघातस्थळाच्या पाहणीसाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत सांगलीहून रवाना झाले आहेत.

No comments:

Post a Comment