सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा : खटाव पंचायत साजमतीचे सभापती संदीप मांडवे आाजण उपसभापती कैलास घाडगे यांच्याविरोधात सोमवारी जिल्हाधिकार्यांकडे अविश्वास ठराव दाखल केला. यासाठी राष्ट्रवादीच्याच सहा सदस्यांनी पुढाकार घेतल्याने एकच खळबळ उडाली. हा ठराव जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे दाखल केली. दरम्यान, मी पक्षशिस्त मानणारा कार्यकर्ता असून ठराव दाखल करण्यापूर्वी सदस्यांनी विश्वासात घ्यायला हवे होते, अशी प्रतिक्रिया सभापती मांडवे यांनी दिली.
जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे दाखल करण्यात आलेल्या ठरावावर हिराचंद पवार, कल्पना मोरे, जयश्री कदम, रेखा घार्गे, संतोष साळुंखे, आनंदराव भोंडवे यांच्या सह्या आहेत. अविश्वास ठराव जिल्हाधिकार्यांकडे दाखल केल्यानंतर सर्वच पंचायत समिती सदस्यांनी सभापती मांडवे आणि उपसभापती घाडगे यांच्या कार्यपध्दतीवर आाजण मनमानी कारभारावर नाराजी व्यक्त केली. खटाव पंचायत समितीचे बारा सदस्य असून यापैकी राष्ट्रवादी आठ तर काँग्रेस दोन आणि भाजप दोन असे बलाबल आहे. खटाव तालुका कोरेगाव, माण आाजण कराड उत्तर या तीन विधानसभा मतदारसंघात समाविष्ट आहे. सभापतींचा गण माण तर उपसभापतींचा गण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात येतो. सभापती संदीप मांडवे आणि उपसभापती कैलास घाडगे यांच्या निवडीच्यावेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक - निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी सदस्यांना प्रत्येकी सव्वावर्षे संधी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सव्वावर्षे पूर्ण झाली आहेत. तरीही दोघांनी राजीनामा दिला नाही. या अनुषंगाने स्थााजनक पातळीवरुन त्यांना कल्पना दिल्यानंतरही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनीही मांडवे आणि घाडगे यांना राजीनामा देण्याबाबत सूचित केल्यानंतरही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे, असे सदस्यांनी सांगितले.
विश्वासात घ्यायला हवे होते
मी पक्षशिस्त मानणारा कार्यकर्ता आहे. सर्व कामकाज वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसारच सुरु आहे. सदस्यांनी ठराव दाखल करण्यापूर्वी विश्वासात घ्यायला हवे होते. परस्पर निर्णय घेतल्याचे वाईट वाटते. नेतेमंडळींशी चर्चा करुनच पुढील निर्णय घेऊ
-संदीप मांडवे,
सभापती खटाव पंचायत समिती

0 Comments