Hot Posts

6/recent/ticker-posts

फलटण येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बेमुदत ठिय्या आंदोलनास सुरुवात (पहा व्हिडिओ)








सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

विक्रम चोरमले/ फलटण - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सातारा जिल्ह्यातील फलटण येथे आजपासून फलटण शहर व तालुक्यातील मराठा समाजाच्यावतीने फलटण तहसिल कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बेमुदत ठिय्या आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे. सकाळी 11 वाजता छ. शिवाजी महाराज यांना अभिवादन करुन या ठिय्या आंदोलनास सुरुवात करण्यात आली.

प्रारंभी बेंदूर सणाच्या पार्श्वभूमीवर बळीराजांचे पुजन करण्यात आले. यानंतर महीलाच्या हस्ते प्रांत अधिकारी संतोष जाधव यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर न झाल्यास आंदोलन अजुन तिव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. मराठा आरक्षणाबाबत शासनाने त्वरीत निर्णय घेवुन मराठा तरुण मुलामुलींना नोकरीत व शिक्षणात आरक्षण दिले पाहीजे अँट्रसिटी कायदा रद्द झाला पाहीजे शासनाने मुक मोर्चाचे वेळी मराठा समाजातील तरुण मुलामुलींना प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी वसतीगृह व शासकीय कर्ज या बाबत जाहीर केलेल्या सर्व योजनांची त्वरीत अंमलबजावणी व्हावी. शेतीविषयक स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी त्वरीत  अंमलबजावणी करण्यात यावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.    


Post a Comment

0 Comments