सातारा-वाघोली-सोळशी एस. टी. बससेवेची सेनेची मागणी - सत्य सह्याद्री

ठळक

Sunday, August 5, 2018

सातारा-वाघोली-सोळशी एस. टी. बससेवेची सेनेची मागणी




सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
वाठारस्टेशन : सोळशी ( ता. कोरेगाव) येथील सातार्‍याला रोज जाणार्‍या येणार्‍या कामगारांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने सोळशीला वाघोली मार्गे सातारवरून एस. टी. बस सेवा सुरू करावी अशा आशयाचे निवेदन उत्तर कोरेगाव तालुका शिवसेनेतर्फे एस. टी.च्या विभागीय नियंत्रकांना आज देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, सोळशी, नायगाव, नांदवळ, सोनके, पिंपोडे बु।्।, वाघोली, आसनगाव, अंबवडे, या गावातून अनेक नागरीक, विद्यार्थी रोज सातारला कामानिमित्त अथवा शिक्षणासाठी ये-जा करत असतात परंतु, एस. टी. बस नसल्याने अनेकांच्या रोजंदारीवर गदा आली आहे. महत्त्वाच्या कामाला तर भाडेतत्वावर वाहन घेऊन जावे लागते व खिशाला मोठी चाट बसते. यावर उत्तर कोरेगाव तालुका शिवसेनेतर्फे एस. टी च्या विभागीय नियंत्रकांना निवेदन दिले गेले व लवकरात लवकर बस सेवा सुरू करण्यासंदर्भात विनंती केली. ही एस. टी. बस सेवा सकाळी 9.30 वा सोळशीतून सातारा येथे असावी तर परत सायंकाळी 6.00 वा परत सातार्‍याहुन सोळशीला यावी असे निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी उत्तर कोरेगाव तालुका शिवसेना प्रमुख श्री संतोषनाना सोळस्कर, उपतालुका प्रमुख प्रशांत निकम, विभाग प्रमुख प्रशांत तावरे, पिपोंडे बु।्। शाखा प्रमुख  श्रीकांत निकम, व शिवसेनेचे युवा नेते वसंत धुमाळ हे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment