अपमानास्पद वागणुकीने पत्रकार आक्रमक - सत्य सह्याद्री

ठळक

Sunday, August 5, 2018

अपमानास्पद वागणुकीने पत्रकार आक्रमक



सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
कराड: पत्रकार विकास जाधव यांना अपमानास्पद वागणूक देऊन आरेरावीची भाषा करत आरोपीची वागणूक देणारे हवालदार शहाजी पाटील यांना तातडीने निलंबित करावे या मागणीचे निवेदन कराड तालुक्यातील पञकारांच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिक्षक नवनाथ ढवळे यांना देण्यात आहे.
यावेळी कराड शहर तसेच तालुक्यातील पत्रकारांची लक्षणीय उपस्थिती होती.  विकास जाधव यांना उंब्रज येथे पोलीस हवालदार शहाजी पाटील यांनी अपमानास्पद वागणूक दिली. शनिवारी हा प्रकार घडला होता.
पाटील यांच्यावर  तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा टप्प्या टप्प्याने आंदोलन तीव्र केले जाईल. त्याला पोलीस प्रशासनाबरोबर हवलदार शहाजी पाटील हे सर्वस्वी जबाबदार राहतील, असा इशारा तालुक्यातील पत्रकारांच्यावतीने देण्यात आला.
  पत्रकार विकास जाधव यांना अपमानास्पद वागणूक देणार्‍या हवालदार शहाजी पाटील यांचे त्वरीत निलंबन करावे. अशा मागणीचे निवेदन यावेळी देण्यात आले.
उंब्रजमधील घटनेचा वडूजमध्ये पत्रकारांकडून निषेध
वडूज : उंब्रज येथील पत्रकार विकास जाधव यांना पोलीसांनी  दिलेल्या अवमानास्पद वागणूकीचा आज खटाव तालुक्यातील पत्रकार संघटनेच्यावतीने निवेदन देऊन निषेध व्यक्त करून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणीही करण्यात आली आहे.
याबाबत तहसिलदार सुशिल बेल्लेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक धरणीधर कोळेकर यांना निवेदन देण्यात आले आहे. अपमानास्पद वागणूक दिली.
लोकशाहीमध्ये प्रसार माध्यमाच्या चौथ्या स्तंभाच्या प्रतिनिधीला अशा प्रकारची अशोभनीय वागणूक मिळणे घृणास्पद आहे. तरी या घटनेचा आम्ही सर्व पत्रकार बांधव तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करीत आहोत. तसेच संबंधित पोलीस कर्मचार्‍यांचे तातडीने निलंबन करण्याची  मागणीही यावेळी करण्यात आली.
यावेळी पत्रकार धनंजय क्षीरसागर, आयाज मुल्ला, महेश गिजरे, शेखर जाधव, जैनुद्दीन उर्फ मुन्ना मुल्ला, पद्मनील कणसे, नितीन राऊत, आकाश यादव, योगेश जाधव, केदार जोशी, गुणवंत गायकवाड, आदी उपस्थित होते.
दरम्यान, जिल्ह्यात ठिकठिकाणी पत्रकारांकडून या घटनेचा निषेध करून निवेदन देण्यात आले. 

No comments:

Post a Comment