लोणंदला क्रेनचालकाचा खून, तासात खुनाचा उलघडा - सत्य सह्याद्री

ठळक

Sunday, August 5, 2018

लोणंदला क्रेनचालकाचा खून, तासात खुनाचा उलघडा


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
लोणंद : येथील पाणीपुरवठा सभापती किरण पवार यांच्या क्रेनवर चालक असलेल्या चंद्रकांत अंकुश साळुंखे या 35 वर्षीय क्रेनचालकाचा रविवारी पहाटे खून झाला. लोणंद पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे गतिमान करत याप्रकरणी एका अल्पवयीन बालकाला ताब्यात घेतले.
लोणंद पोलीस ठाणे हददीत एम. आय. डी. सी. शिरवळ रोड लोणंद येथे चंद्रकांत अंकुश साळुंखे यांचा अज्ञाताने दगड, रॉड व धारदार शस्त्राने खून केल्याची खबर पोलिसांना मिळाली.
घटना स्थळी फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अभिजित पाटील यांनी त्वरित भेट दिली व तपासकामी श्वान पथकास व ठसे तत्ज्ञ यांस तातडीने तपास कामी पाचारण केले. यादरम्यान घटना स्थळी इमारत च्या आजूबाजूला हे श्वान पथक घुटमळले,
फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, पोलीस उपनिरीक्षक गणेश पवार, पोलीस काँस्टेबल श्रीनाथ कदम, संजय देशमुख, सागर बडदे, रोहित गायकवाड, सागर धेंडे आदी कर्मचार्‍यांनी सक्षम तपास यंत्रणा राबवून एका संशयित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. अधिक चौकशी नंतर संबंधित अल्पवयीन मुलाने पैशाच्या देवाणघेवाण वरुण हा प्रकार झाल्याचे कबुली दिली. घटना स्थळी नागरिकांनी गर्दी केली होती .
सदर तपास यंत्रणेतील पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर, उपनिरीक्षक गणेश पवार व कर्मचारी वर्गाचे लोणंद फाउंडेशन, लोणंद चे प्रवर्तक दयानंद खरात, कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. विलायत उर्फ बबलु मणेर, समन्वय समिति प्रमुख कय्युम मुल्ला, सहसचिव मंगेश माने यांच्या वतीने  सत्कार करण्यात आला व आभार व्यक्त केले आहे. अधिक तपास लोणंद पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर करित आहेत.
खबर मिळताच मिळताच 1 तासांच्या आत फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ अभिजीत पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी योग्य दिशेने शोध मोहीम राबऊन एका अल्पवयीन संशयित आरोपीस ताब्यात घेऊन पुर्ण प्रकारांचा लावला छडा लावला. याबद्दल लोणंद फाउंडेशन, लोणंद चे वतीने तपास यंत्रणा पोलीस अधिकारी व कर्मचारी याचा सत्कार करण्यात आला. विविध क्षेत्रातील नागरिक व संघटनांनी याबाबत समाधान व्यक्त केले. 

No comments:

Post a Comment