सरकार विरोधात शेळ्या मेंढया, घोड्यासह चूल मांडून आंदोलन (पहा व्हिडिओ) - सत्य सह्याद्री

ठळक

Thursday, August 2, 2018

सरकार विरोधात शेळ्या मेंढया, घोड्यासह चूल मांडून आंदोलन (पहा व्हिडिओ)



विक्रम चोरमले / फलटण :- धनगर समाजाला राज्यघटनेत दिलेले अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसाठी फलटण तालुक्यातील धनगर बांधवांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाच्या पाचव्या दिवशी सरकार विरोधात शेळ्या मेंढया, घोडे असे संपूर्ण कुटूंबासह आंदोलनस्थळी चूल मांडून आंदोलन केले.

यावेळी सरकार विरोधी जोरदार घोषणा देण्यात आल्या. पुढील काळात धनगर समाजाची आरक्षणाची मागणी पूर्ण न झाल्यास आमदार व  खासदाराच्या घरासमोर शेळ्या मेंढया, घोडे असे संपूर्ण कुटूंबासह चूल मांडून आंदोलन करणार असे  धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment