वैष्णवांचा मेळा पाडेगाव मध्ये विसावला. - सत्य सह्याद्री

ठळक

Wednesday, August 1, 2018

वैष्णवांचा मेळा पाडेगाव मध्ये विसावला.




 सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

लोणंद : आपल्या परतीच्या प्रवासातील फलटण ते पाडेगाव असा मोठा टप्पा पार करून ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आज संध्याकाळी साडेपाच वाजता पाडेगाव मुक्कामी विसावला. 


आज पहाटे फलटण येथून निघालेला सोहळा संध्याकाळी पाचच्या सुमारास पाडेगावच्या वेशीवर टाळ मृदंगाच्या गजरात पोहचला. येथे पाडेगावच्या स्वागत कमानीपाशी माऊलींचे स्वागत पाडेगावच्या सरपंच सौ स्मिताताईं खरात पाटील, पंचायत समिती सदस्या रेखाताई खरात पाटील, बाबासाहेब खरात, माजी जि. प. सदस्य अशोकराव खरात, रूपालीताई मोहीते, प्रवीण ढावरे, रोहिदास पिंगळे, तसेच पाडेगाव ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी व राजेश खरात, बिपीन मोहीते, नितीन जगताप, सूर्यकांत खरात, विनायक आबा खरात, प्रशांत अरविंद ढावरे, नाना ढावरे, राजेंद्र गोरे आदी मान्यवरांनी केल्या नंतर माऊलींच्या रथाला पाडेगावातील बैल जोडी जोडून टाळ मृदंगाच्या गजरात पाडेगाव जि प शाळेच्या आवारात रथ पोहचला. तद्नंतर गावकऱ्यांनी माऊलींची पालखी खांद्यावर घेऊन माऊली सभागृहात वाजत गाजत आणली. सर्व वारकरी भाविकाना गावकऱ्यांच्या वतीने पंचपक्वान्नांच्या भोजनाची सोय करण्यात आली. माऊलींच्या आजच्या मुक्कामानंतर ऊद्या सकाळी सात वाजता सोहळा पुण्याच्या दिशेने रवाना होईल. 


लोणंद पोलिस स्टेशनच्या वतीने सोहळ्या सपोनि गिरिश दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस फौजदार वाघमारे, सहा. पोलिस फौजदार क्षीरसागर , पवार, काॅ. शिंदे. हवा. शेख, यादव, इवले यांनी पालखी मुक्कामी चोख बंदोबस्त ठेवला आहे. 

No comments:

Post a Comment