श्रीमंत रामराजे निंबाळकर यांच्या हस्ते होणार विद्यार्थ्यांना गणवेश व चष्म्याचे वाटप - सत्य सह्याद्री

ठळक

Wednesday, August 1, 2018

श्रीमंत रामराजे निंबाळकर यांच्या हस्ते होणार विद्यार्थ्यांना गणवेश व चष्म्याचे वाटप

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

विक्रम चोरमले / फलटण  :-गुरुवार दि 2 रोजी दुपारी चार वाजता फलटण नगर परिषदेच्या श्रीमंत रामराजे प्रतापसिंह नाईक निंबाळकर सभागृहात मा. नामदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर सभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते नगर परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती यांच्या वतीने गणवेश वाटप व महिला व बालकल्याण समिती यांच्यावतीने चष्मे वाटप करण्यात येणार असून सदरचा कार्यक्रम मा. आमदार दीपकरावजी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.


 या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राहुल नार्वेकर, फलटण मार्केट कमिटी चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी उपळेकर महाराज मंदिर श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदे सदस्य श्रीमंत शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, पंचायत समिती सदस्य श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर हे उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाची माहिती शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्य सभापती सौ प्रगतीताई कापसे व महिला व बालकल्याण सभापती ज्योत्स्ना शिरतोडे यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment