बसचालकाने वाचवले बुडणार्‍या महिलेचे प्राण - सत्य सह्याद्री

ठळक

Wednesday, August 1, 2018

बसचालकाने वाचवले बुडणार्‍या महिलेचे प्राण




सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

खटाव  : कोरेगाव येथे बुधवारी सकाळी कॅनॉलमध्ये बुडणार्‍या महिलेचे प्राण चॅलेंज अ‍ॅकॅडमीच्या स्कूलबस चालकाने वाचवले.


सकाळी साडेआठ ते नऊ च्या सुमारास चॅलेंज अ‍ॅकडमीची स्कूलबस क्र 9 प्रवीण नारायण वाघमळे घेऊन जात होते. त्यावेळी रस्त्यालगत असलेल्या तुडुंब भरलेल्या कण्हेर कालव्यात  मंगळापूर (ता. कोरेगाव) येथून वृद्धा सरस्वती उत्तम घोरपडे (वय 60) वाहत चाललेली वाघमळे यांना दिसली. होती. वाघमळे यांनी तात्काळ बस थांबवून कॅनॉलमध्ये उडी मारली व त्या महिलेला पाण्यातून बाहेर काढले. 


त्यानंतर त्यांनी रुग्णवाहिका बोलावून त्या महिलेला कोरेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आल्याचे कठापूरचे उपसरपंच किरण केंजळे यांनी सांगितले.


सदर प्रकार विद्यार्थ्यांनि प्राचार्या लेफ्टनंट ऋथा जोशी व चॅलेंज अ‍ॅकडमी स्कूलचे संस्थापक अध्यक्ष दिलीप वलियाविट्टील यांना सांगितले.वरिष्ठांनी चालक वाघमळे यांना बोलावून त्यांचे अभिनंदन व कौतुक केले. स्कूबस चालक वाघमळे यांचे कार्य पाहता आपल्या जीवाची पर्वा न करता एका वृद्ध महिलेचे जीव वाचवले हे फार पुण्याचे व धाडसाचे काम आहे.असे प्रतिपादन स्कुलच्या प्राचार्या लेफ्टनंट ऋथा जोशी दिलीप विलियावीट्टील यांनी केले आहे.असे प्रामाणिक व निडर कर्मचारी आमच्या संस्थेत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असेही ते म्हणाले. वाघमळे यांच्या धाडसाबद्दल कौतूक होत आहे. 

No comments:

Post a Comment