शाळा समिती अध्यक्षपदी अ‍ॅड. सचिन तिरोडकर यांची निवड - सत्य सह्याद्री

ठळक

Thursday, August 30, 2018

शाळा समिती अध्यक्षपदी अ‍ॅड. सचिन तिरोडकर यांची निवड


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 
सातारा: कारी (ता. सातारा) येथील जानाई देवी शिक्षण मंडळ संचलित श्री समर्थ रामदास विद्यालय कारी येथील शाळा समिती अध्यक्षपदी शाहूनगर (सातारा) येथील  अ‍ॅड. सचिन तिरोडकर यांची नुकतीच निवड करण्यात आली.
अ‍ॅड. तिरोडकर हे अश्‍वमेघ पतसंस्था, चॅरिटी अ‍ॅडव्होकेट्स बार असोसिएशन सातारा, सातारा जिल्हा शरीरसौष्ठव संघटना तसेच प्रतापसिंहराजे (थोरले) नगरवाचनालयाच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. या क्षेत्रातील कामाची दखल घेऊन त्यांची शाळा समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या पदाच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणार असल्याचे अ‍ॅड. तिरोडकर यांनी निवडीनंतर बोलताना सांगितले. 
शाळा समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अ‍ॅड. तिरोडकर यांचे संस्थेचे अध्यक्ष नामदेव मोरे, कार्यवाहक, एम. एन. जाधव, मुख्याध्यापक, कर्मचारी तसेच संस्थेचे सभासद व ग्रामस्थ तसेच सातारा शहर परिसरातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. 

No comments:

Post a Comment