शिवेंद्रसिंह-दीपक पवारांच्यात पुन्हा जुगलबंदी - सत्य सह्याद्री

ठळक

Thursday, August 30, 2018

शिवेंद्रसिंह-दीपक पवारांच्यात पुन्हा जुगलबंदी



सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा: सातारा-जावली विधानसभा मतदारसंघातील रस्ते व पेयजल योजनेसाठी मंजूर निधीवरून दीपक पवार व आमदार शिवेंद्रसिंह भोसले यांच्यात पुन्हा जुगलबंदी रंगण्याची चिन्हे असून यामुळे जनतेची चांगलीच करमणूक होत आहे.
केंद्राकडून मिळालेल्या निधीची खोटे श्रेय आमदार घेत असल्याचा आरोप दीपक पवार यांनी पत्रकार परिषदेत केला होता. केंद्राकडून 367 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून यामध्ये सातारा तालुक्यातील सात व जावळी तालुक्यातील 26 गावे आहेत. या कामाचे खोटे श्रेय आमदार भोसले घेत आहेत. त्यांच्या खोटारडेपणाची पत्रके मतदारसंघातील जनतेला वाटणार असल्याचे पवारांनी सांगितले.
पंधरा वर्षात त्याने केलेल्या कामाचा हिशेब मांडावा. स्वत:ला ते राजघराण्यातील समजतात. यांच्याकडे पन्नास वर्षे सत्ता होती. मात्र, महू हातगेघर धरणासाठी एक रुपया त्यांनी आणला नाही. त्यामुळे आमदारांनी थापेबाजी बंद करावी, असे पवार म्हणाले.
गावडेंचे प्रत्युत्तर
कोणतेही काम झाले की ते माझ्यामुळे झाले, अशी घोकमपट्टी केली   जात आहे. त्यामुळे आमदारकीचे स्वप्न पाहणार्‍यांचा बालिशपणा उघड झाला असल्याची टीका जावलीचे उपसभापती दत्ता गावडे यांनी पत्रकाद्वारे पवार यांच्यावर केली अलाहे. आमदारांचे माप काढण्यापेक्षा जिल्हा परिषद गटात एखादे तरी काम करून दाखवा असा सल्ला गावडेंनी पवारांना पत्रकाद्वारे दिला आहे.
स्टेटमेंट कार्यकर्त्याचे, पत्रक मात्र ङ्गसुरुचिफवरुन
पवारांच्या पत्रकार परिषदेला उपसभापती गावडेंनी प्रत्युत्तर दिले खरे. परंतु, त्यांचे पत्रक ङ्गसुरुचिफवरून प्रसारमाध्यमांकडे पाठवण्यात आले. आमदार भोसले यांच्या दुसर्‍या फळीतील नेते बर्‍याचदा थेट कधीच बोलत नाहीत किंवा पत्रकार परिषदही घेत नाहीत. नगरपालिका असो किंवा अन्य कोणतेही राजकीय काऊंटर स्टेटमेंट असो हे ङ्गसुरुचिफ बंगल्यावरूनच बहुतांश वेळा जारी केले जाते. भले हे स्टेटमेंट त्या नेत्यांचे किंवा प्रवक्त्यांचे असले तरी ते थेट त्यांच्यामार्फत न येता ङ्गसुरुचिफवरूनच पाठवले जाते. 
दरम्यान, केवळ ङ्गसुरुचिफ नव्हे तर ङ्गजलमंदिरफवरूनही अशी अनेक काऊंटर पत्रके निघत असतात. त्याउलट भाजपचे असे सत्ता केंद्र नसल्याने त्यांची वेगवेगळी पत्रके येतात किंवा पत्रकार परिषदा होतात. एकंदरीत जिल्ह्यातील अन्य तालुक्यांच्या तुलनेत सातारचे राजकारण वेगळे आहे, हेच खरे.

No comments:

Post a Comment