म्हसवड पोलिसांची वाळूवर कारवाई - सत्य सह्याद्री

ठळक

Wednesday, August 29, 2018

म्हसवड पोलिसांची वाळूवर कारवाई



देवापूर: बुधवारी सायंकाळी म्हसवड पोलीसांनी महाबळेश्‍वरवाडी येथे चोरट्या वाळूवर कारवाई करत ट्रॅक्टर जप्त केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री मालोजीराव देशमुख यांना खबर्‍यांकडून मिळालेल्या माहितीनुसार मौजे वरकुटे मलवडी येथील महाबळेश्वरवाडी येथे मल्हारी मारुती चव्हाण (वय. 35 रा. वरकुटे-मलवडी)  हे ट्रॅक्टरमधून वाळूची चोरटी वाहतूक करत होते. पोलीस कर्मचारी संतोष बागल, जाधव व श्री. धुमाळ यांच्या संयुक्त पथकाने सापळा रचून सदरचा ट्रॅक्टर व चालकास ताब्यात घेतले. बागल यांनी चालकाला वाहतुकीचा परवान्याबद्दल विचारले असता त्याच्याजवळ परवाना नसल्याचे दिसून आले.  सदर पथकाने  ट्रॅक्टरसहित 3000 रुपये किमतीची वाळू जप्त करण्यात आली.सदर व्यक्तीवर म्हसवड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत. म्हसवड पोलिसांचे कौतुक होत आहे. 

No comments:

Post a Comment