माणदेश फाऊंडेशनचा पुण्यात स्नेहमेळावा - सत्य सह्याद्री

ठळक

Tuesday, August 7, 2018

माणदेश फाऊंडेशनचा पुण्यात स्नेहमेळावा

म्हसवड- पुुुणेस्थित " माणदेश फाऊंडेशन " च्या वतीने दिला जाणारा यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार , सावित्रीबाई फुले स्मृती पुरस्कार व पूण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर स्मृती पुरस्कार त्याचबरोबर विविध क्षेत्रातील कर्तृत्वान व्यक्तींचा गौरव सोहळा व माणवासियांचा स्नेहमेळावा पुणे येथे लवकरच होणार आहे. सदर स्नेहमेळावा कार्यक्रम राज्यातील राजकीय, सामाजिक काम करणाऱ्या मान्यवरांच्या उपस्थित संपन्न होणार आहे अशी माहिती माणदेश फाऊंडेशनेचे अध्यक्ष अशोकराव माने, उपाध्यक्ष विजयराज पिसे, कार्याध्यक्ष प्रविण काळे सचिव अभिजीत माने यांनी दिली आहे. 



माजी सनदी अधिकारी व माणदेश फाऊंडेशनेचे मार्गदर्शक श्री. प्रभाकर देशमुख साहेब व मूंबईचे अतिरिक्त आयकर आयूक्त श्री डॉ.नितीन वाघमोडे यांचे मार्गदर्शनाखाली नूकतीच पुणे येथे बैठक संपन्न झाली. यावेळी फाऊंडेशनेच्या सल्लगार विश्वस्त सौ. अनूराधा देशमुख , सौ.सपना वाघमोडे  अध्यक्ष अशोकराव माने , उपाध्यक्ष विजयराज पिसे , कार्याध्यक्ष प्रविण काळे , सचिव अभिजीत माने , माजी अध्यक्ष सूनिल बाबर , माजी अध्यक्ष अभय जगताप , संदीप सूळे , मिलिंद पिंगळे , आनंदराव जगताप , यशवंत काळेल , सर्जेराव भोसले आदी विश्वस्त उपस्थित होते . 



मूळचे माण तालूक्यातील रहिवाशी व कामानिमित्त पृणे तसेच इतर ठिकाणी स्थायिक असणाऱ्या नागरिकांना एकत्र आणण्यासाठी या स्नेहमेळाव्याचे आयोजन केले आहे . व माण वासियांनी विविध क्षेत्रात अटकेपार लावलेले झेंडे व माण तालूक्यातील यशस्वीतांचा गौरव सोहळा आयोजित केला आहे. प्रशासकीय , उद्योग , सामाजिक , आदर्श माता , आदर्श गाव , आदर्श शिक्षक ,  कला , क्रिडा , सहकार , वैद्यकिय , शैक्षणिक ,  शेती , कामगार , पत्रकार , आदर्श विद्यार्थ्यां या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्यांना पुरस्कार देण्यात येतो. रोख रक्कम , स्मृतीचिन्ह , शाल , पूष्पहार व श्रीफळ देवून गौरविण्यात येणार आहे. तरी या पूरस्कारासाठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या योग्य व्यक्तींची माहिती फाऊंडेशनेला द्यावी . त्यामध्ये संपूर्ण नाव , पत्ता , जन्मतारिख ,  केलेल्या कार्याची संपूर्ण माहिती , पासपोर्ट आकाराचे दोन फोटो , संपर्क क्रमांक असावेत .


तरी तमाम माणवासियांना फाऊंडेशनेच्या वतीने विंनती करण्यात येत आहे की विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या योग्य व्यक्तींचे किंवा संस्थेचे नाव सूचवावे अथवा राज प्रोसेस इक्विपमेंटस & सिस्टिम प्रा.लि , जय गणेश व्हीजन , जय गणेश बिल्डींग , बी विंग , तिसरा मजला , आकूर्डी पुणे या पत्यावर पाठवावे अधिक माहितीसाठी फाऊंडेशनेचे उपाध्यक्ष विजयराज पिसे 9890631732  यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष अशोकराव माने यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment