आत्महत्याप्रकरणी तिघे अटकेत, दोघे गायब - सत्य सह्याद्री

ठळक

Sunday, August 19, 2018

आत्महत्याप्रकरणी तिघे अटकेत, दोघे गायब


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
फलटण :  फलटण तालुक्यातील होळ येथील उपसरपंच विनोद बबन भोसले यांच्या आत्महत्या प्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली असून 2 जण अद्याप गायब आहेत.
शुक्रवारी 17 रोजी  जिंती खुंटे रस्त्यावर खुंटे गावच्या हद्दीत जिंती बाजुकडच्या रस्त्यावर  उजव्या बाजुस 200 फुटावर विनोद बबन भोसले यांनी जांभळाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला होता. घटनास्थळी पोलिसांना विनोदच्या खिशातील मोबाईलच्या कव्हर मध्ये चिठ्ठी मिळाली ज्यात रविराज राजाराम घनवट रा. रामपार्क अर्पाटमेंट जाधववाडी फलटण, बाळु मुंकुदा कोळेकर रा.कोर्‍हाळे खुर्द चव्हणवस्ती ता.बारामती जि.पुणे, अनिल चांदगुडे रा.जिंती नाका फलटण, विनोद हणमंत चव्हाण रा.शेरेवाडी ढवळ ता. फलटण हे व रविंद्र हरिभाऊ काकडे रा. मंगळवार पेठ फलटण यांचा मुलगा मोबाईल वरून फोन करून त्रास देत असले बाबत लिहीले होते.
चिठ्ठीत 5 खाजगी  सावकारांची नावे,पत्ता , फोन नंबर, घेतलेली रक्कम, व्याजाची रक्कम असा तपशील लिहिला होता. या पाच नावे असणार्‍या लोकांकडे बँकाचे चेक व गाडीची कागदपत्रे ठेवल्याचे लिहीलेले असून सर्व पैसे देवुन सुध्दा भयंकर मानसिक त्रास होत असल्याचे नमूद होते.
या बेकादेशीर खाजगी सावकारांकडुन घेतलेल कर्ज व त्यापोटी झालेल्या व्याजा पोटी तगादा लावला त्यामुळे विनोद भोसले यांचे जगणे असाह्य झाल्याने खाजगी सावकारांकडुन मागील एक वर्षापासून होणार्‍या मानसिक त्रासातुन कंटाळून विनोद भोसले यांनी आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीत म्हटले होते.
या प्रकरणी वरील 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता त्यापैकी रविराज राजाराम घनवट रा. रामपार्क अर्पाटमेंट जाधववाडी फलटण, अनिल चांदगुडे रा. जिंती नाका फलटण, अभिषेक रविंद्र  काकडे रा.मंगळवार पेठ फलटण यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सदर प्रकरणातील बाळु मुंकुदा कोळेकर (रा.कोर्‍हाळे खुर्द चव्हणवस्ती, ता.बारामती जि.पुण), विनोद हणमंत चव्हाण रा. शेरेवाडी ढवळ (ता.फलटण) हे अद्याप फरारी असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटेननेने फलटण तालुक्यात खळबळ उडाली आहे. 

No comments:

Post a Comment