फलटण येथे खाजगी सावकारकी प्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल - सत्य सह्याद्री

ठळक

Wednesday, August 22, 2018

फलटण येथे खाजगी सावकारकी प्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

फलटण :- फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अवैध सावकारकी करणाऱ्याच्या विरोधात तक्रारीचा ओघ दिवसेन दिवस वाढत आहे. तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख संदिप पाटील यांच्या बदलीनंतर खाजगी सावकारकीने पुन्हा एकदा तोंड वर काढले आहे. फलटण येथील चार जणांच्या विरोधात खाजगी सावकारकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी संतोष पवार यास अटक करण्यात आली आहे.


याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात आज मंगळवार दि .21 रोजी युवराज सुरेश संकपाळ (बोंद्रे) वय 32 रा. मुरूम ता.फलटण जि. सातारा यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, 2016 मध्ये गाडीचा अपघात झाल्याने  अमोल वसंत भिलारे या मित्राच्या ओळखीने कै.रविंद्र हरिभाऊ काकडे रा .मंगळवार पेठ फलटण याच्याकडून 25 लाख रुपये 8 टक्के व्याजाने घेतले होते. त्यापैकी 16 लाख 50 हजार रूपये रोख दिले व उरलेले 8 लाख 50 हजार रूपये सर्व पैसे रविंद्र काकडे यांच्या घरी नेहून दिले होते यावेळी अमोल भिलारे माझे बरोबर होते असे तक्रारदार यांनी फिर्यादीत सांगितले आहे.


यानंतर मी भिसी स्वरूपात ऑक्टोबर 2016 साली 10 लाख घेतले होते त्यानंतर मी पैसे घेतले नाही परंतु रविंद्र काकडे याने मला व्याज व मुद्दल धरून 25 लाख रुपये देणे लावले व महिना 2 लाख 30 हजार रुपये व्याज दिले व भिसी स्वरूपात दर महिना 50 हजार रूपये  दिले आहेत यानंतर मी त्यांना व्याज मुद्दल दिले नाही सर्व पैसे माझेकडून संपले होते त्यानंतरही कै.रविंद्र काकडे हा माझ्या घरी आला भिसी स्वरूपात घेतलेले मुद्दल 10 लाख व्याजासह परत का देत नाही असे म्हणून मला व माझे आई वडील व बायको यांना शिवीगाळ दमदाटी करत मला हाताने मारहाण केली त्यानंतर आठ दिवसांनी  मुळीकवाडी रोडवरील बडेखान ता.फलटण येथील फार्महाऊसवर बोलवुन घेऊन तिथे मारहाण करून  तू जर आता फलटणला आला तर तुला मारून टाकू अशी धमकी दिली. त्यानंतर जून 2017 मध्ये मी माझे व आई वडीलांच्या नावावरील मुरुम ता.फलटण येथील 3.5 एकर जमीन विकून 36 लाख रुपये मागितले होते परंतु आपापसात तडजोड करून हातापाया पडून 25 लाख रोख दिले एप्रिल 2017 मध्ये मला पैशाची गरज असल्याने व रविंद्र काकडे यांचे सर्व व्याजाचे पैसे देण्यासाठी मी उमेश पवार (पूर्ण नाव माहीत नाही) रा. सोमवार पेठ फलटण यांच्याकडून 1 लाख रुपये 20 टक्के व्याजाने घेतले त्यानंतर विजय पवार (पूर्ण नाव माहीत नाही) रा. सोमवार पेठ फलटण याच्याकडून 1 लाख रुपये 15 टक्के व्याजाने घेतले होते त्यापैकी उमेश पवार यास मुद्दल व व्याज असे 1 लाख 60 हजार परत दिले. विजय पवार याच्याकडून घेतलेल्या 1 लाख 60 हजार रुपये व्याज स्वरूपात दिलेले आहेत सर्व व्याज देऊनही उमेश पवार व विजय पवार यांनी नोव्हेंबर 2017 मध्ये काळज येथे येऊन आमचे राहिलेले व्याज व मुद्दल परत दे असे म्हणत शिवीगाळ दमदाटी करत हाताने मारहाण केली आहे त्यानंतर संतोष पवार (पूर्ण नाव माहीत नाही) रा. सोमवार पेठ फलटण याच्याकडून 20 टक्के व्याज दराने 3 लाख रुपये घेतले यानंतर डिसेंबर 2017 मध्ये पैसे घेऊन उमेश पवार व विजय पवार यांचे पैसे फलटण येथे जाऊन दिले त्यानंतर जानेवारी 2018 पासून 5 ऑगस्ट 2018 पर्यत प्रत्येक महिन्यात व्याजासह 1 लाख 60 हजार रुपये दिले आहेत त्यानंतर विजय पवार व संतोष पवार, उमेश पवार हे तिघे जण सकाळी घरी मुरुम येथे 9 ऑगस्ट 2018 रोजी आले यावेळी मी घरी नव्हतो यावेळी त्यांनी घरी निरोप ठेवला की 4 वाजता काळज मुरूम  रोडवर येवून भेटायला सांगितले यावेळी मी काळज येथे भेटायला गेलो असता मला 5 लाख रुपयांची मागणी केली व पैसे दिले नाही तर तुला जीवे मारू अशी धमकी दिली तसेच  कै. रविंद्र काकडे यांचा मोठा मुलगा यांने फार्महाऊसवर बोलवुन घेतलेल्या 2 लाख रुपयांची मुद्दल व 6 लाख देऊनही 5 लाख रुपयांची मागणी करून शिवीगाळ व दमदाटी केली. या वरून ग्रामीण पोलीस ठाण्यात वरील लोकांविरोधात अवैध सावकारकी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. या प्रकरणी संतोष पवार यास अटक करण्यात आली आहे.अधिक तपास पोलीस निरीक्षक सजन हंकारे करत आहेत.

No comments:

Post a Comment