वाठार स्टेशनला हमालाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या - सत्य सह्याद्री

ठळक

Monday, August 6, 2018

वाठार स्टेशनला हमालाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या



सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

वाठार स्टेशन : येथील विजय विनायक लोंढे (वय 46) यांनी सातारा- लोणंद रोड वरील महाराजा हॉटेल समोरील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.


अधिक माहिती अशी की, वाठार स्टेशन येथील विजय विनायक लोंढे हे बर्‍याच वर्षापासून बाजारपेठेत व्यापार्‍यांकडे हमालीचे काम करत होते. ते सर्वत्र परिचित होते सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास विहीर मालक बाळासाहेब लोंढे हे विहिरीची मोटर चालू करण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीतील पाणी पातळी बघत असताना काहीतरी तरंगत असल्याचे दिसून आले त्यावर त्यांनी आपला मुलगा सोपान यांना हाक मारली असता त्यांना कोणीतरी पडले असल्याचे दिसून आले परंतु मृत व्यक्ती पाण्यात पालथी असल्याने कोण आहे ते कळू शकले नाही. बाळासाहेब लोंढे यांनी लगेच वाठार पोलिसांशी संपर्क साधला व त्यांना विहिरीत कोणीतरी व्यक्ती पडले असल्याचे सांगितले. त्यावर वाठार पोलीस घटनास्थळी हजर होऊन मृतदेह क्रेनच्या साह्याने वर काढला.व मृतदेहाची ओळख पटवून घटनास्थळी मृतदेहाचे पोस्टमॉर्टेम करून शवविच्छेदनासाठी पिंपोडे बुद्रुक येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला पुढील तपास पोलीस निरीक्षक चिंचकर पोलीस कर्मचारी जगताप, मोरे, कुंभार करत आहेत.

No comments:

Post a Comment