चोराडेत दोन वाळू डंपरवर कारवाई - सत्य सह्याद्री

ठळक

Monday, August 6, 2018

चोराडेत दोन वाळू डंपरवर कारवाई


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

औंध : चोराडे फाटयानजीक अवैधरित्या वाळू वाहतूक करणार्‍या दोन डंपरवर कारवाई करून दोन जणांना अटक करून वाळू डंपरसह सुमारे वीस लाखाचा मुद्देमाल औंध पोलीसांनी जप्त केला.


याबाबत अधिक माहिती अशी सोमवारी पहाटे दोनच्या सुमारास कराडहून समाधान बापू लगाडे (वय 28, रा.कराड) हा  डंपर मधून कराडकडे तीन ब्रास वाळू घेऊन निघाला होता. त्याचबरोबर  सचिन तातोबा माने (वय 25, रा.नांदलापूर ता.कराड हा डंपर मधून तीन ब्रास वाळू घेऊन मायणीकडून कराडकडे निघाला होता.


यावेळी औंध पोलीस स्टेशनचे  पोलीस कर्मचारी रात्रगस्त घालत असताना चोराडे गावानजीक पोलीसांनी डंपर पकडून ही कारवाई केली. यामध्ये दोन डंपर वाळूसह वीस लाख बेचाळीस हजाराचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी समाधान  बापू  लगाडे व सचिन तातोबा माने यांना औंध पोलिसांनी अटक केली आहे.


याबाबतची फिर्याद पोलीस हवालदार प्रशांत पाटील यांनी दिली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जाधव, पोलीस उपनिरीक्षक  श्रीकांत देव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार चंद्रकांत पाटील, सुभाष डुबल यांनी ही कारवाई केली. याबद्दल समाधान व्यक्त होत आहे.


No comments:

Post a Comment