कान्हरवाडी येथे ऐंशी हजाराची चोरी - सत्य सह्याद्री

ठळक

Sunday, August 5, 2018

कान्हरवाडी येथे ऐंशी हजाराची चोरी


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

मायणी : कान्हरवाडी ता. खटाव येथे दि. 3 रोजी बंद घरात चोरट्यानी चोरी करून तब्बल ऐंशी हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे.


याबाबत मायणी पोलीस स्टेशन मधून मिळालेली माहिती अशी,कान्हरवाडी येथे दि. 3 रोजी गावातील देवीची जत्रा होती.त्या जत्रेच्या निमित्ताने सुरेश येलमार हे रात्री 8 च्या सुमारास गेले होते. त्यानंतर ते रात्री साडे नऊच्या सुमारास घरी परतले. तेव्हा घराचा दरवाजा उघडा असल्याचे त्यांच्या लक्षात आले.


त्यांनी घरात जात पाहणी केली. तेव्हा घरातील रोख रक्कम व चांदीचे दागिने असा सुमारे ऐंशी हजाराचा चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी सुरेश येलमार यांनी वडूज पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या चोरीचा तपास सहा. फौजदार दौलताडे करत आहेत.

No comments:

Post a Comment