मांजा कापल्याने गोखळीचा कामगार गंभीर - सत्य सह्याद्री

ठळक

Monday, August 6, 2018

मांजा कापल्याने गोखळीचा कामगार गंभीर



सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

फलटण : दुचाकीवरून जात असताना मांजा कापल्याने गोखळी येथील कामगार गंभीर जखमी झाला. सुरेश संभाजी जगताप (वय 55) यांंच्या चेहर्‍यावर 15 टाके पडले असून राजाळेनजीकच्या ननवरे वस्तीनजीक ही घटना घडली. चायनीज मांजा कापल्याने जखमी होण्याची दोन दिवसांतील ही दुसरी घटना आहे.


फलटण येथील श्रीराम सहकारी साखर कारखाना संचलित नीरा व्हॅली-डिस्टिलरी मध्ये सुरेश जगतात कामगार आहेत. कामावरून आपल्या घराकडे स्वतःच्या दुचाकीवरून जात असताना रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घटना घडली. वस्तीवरील एकाने त्यांना वेळीच राजाळे येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले. तात्पुरता उपचार करून फलटण येथील सुविधा हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले डॉक्टर सचिन शिंगाडे यांनी. वेळीच यशस्वी  शस्त्रक्रिया करण्यात आल्याने अनर्थ टळला.


गतवर्षी चायनीज मांजा कापल्याने दोन- तीन जणांचा बळी गेला होता.तद्नंतर फलटण शहरातील व ग्रामीण भागातील दुकानदारांनी चायनीज मांजा विक्री न करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, पुन्हा यावर्षी चायनीज मांजा विक्री पंचमी पूर्वी विक्री सुरू असल्याने दुर्घटना घडून येत आहेत. प्रशासनाने त्वरीत कायदेशीर कारवाई करून चायनीज मांजा वर बंदी आणावी, अशी मागणी गोखळीचे माजी सरपंच नंदकुमार गावडे यांनी केली आहे. गोखळी गावातील सर्व दुकानात चायनीज मांजा विक्री करू नये असे आवाहन करण्यात आले असुन चायनीज मांजा विक्री करताना सापडल्यास कारवाई करण्यात येईल असे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मनोज तात्या गावडे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment