ट्रक-दुचाकी अपघातात युवक ठार - सत्य सह्याद्री

ठळक

Wednesday, August 1, 2018

ट्रक-दुचाकी अपघातात युवक ठार




सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क


औंध : नोकरीच्या निमित्ताने पुणे येथे असलेल्या गोपुज येथील 22 वर्षीय युवकाचा ट्रक-दुचाकीच्या झालेल्या भीषण अपघातात दुर्देवी मृत्यू झाला त्याच्यासोबत असणार्‍या मित्रावरही काळाने घाला घातला,या घटनेने अवघे गोपुज सुन्न झाले असून हळहळ व्यक्त होत आहे.


याबाबत मिळालेली माहिती अशी की,  स्वप्नील सुनील देशमुख (वय 22 रा. गोपुज) व संतोष छगन मेहेर (वय 22, रा रोपळे, ता माढा) हे दोघे त्यांच्या दुचाकीवरुन सोमवारी रात्री साडे बारा वाजता जात होते. नर्‍हे येथील भुमकर पुलाजवळील सेवा रस्त्यावर आले असताना पाठीमागुन भरधाव आलेल्या ट्रकनेदुचाकीला पाठीमागुन धडक दिली. ही धडक  जोरदार बसल्याने दुचाकी ट्रकच्या पुढील चाकाखाली आली. त्यामध्ये संतोष व स्वप्नील दोघेही चिरडले गेले. सिंहगड पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेऊन  ट्रकचालक उमेश नाना जावळ ( वय 41, रा  मेढा) यास ताब्यात घेण्यात आले आहे. स्वप्नीलच्या कुटुंबियांचा आक्रोश ह्रदय पिळवटून टाकणारा होता.

No comments:

Post a Comment