फलटण :- फलटण शहर, तालुका परिसरात आपल्या गुन्हेगारी कृत्याने दहशत माजवणाऱ्या 1)भरत लक्ष्मण फडतरे राहणार- मलटण,तालुका- फलटण जिल्हा -सातारा, 2) विजय दत्तू ननावरे, राहणार - आखरी रास्ता, मंगळवार पेठ फलटण 3) स्वप्निल गुलाब जावळे राहणार- बोरी,तालुका-खंडाळा, जिल्हा- सातारा यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मा. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पोलीस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलीस अधीक्षक अभिजीत पाटील व फलटण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रकाश सावंत यांच्या मार्गदर्शनाने फलटणमध्ये गुन्हेगारी कारवाई करत असलेल्या भरत फडतरे टोळीवर मोक्का लावण्यात आला आहे.
1 Comments
सर्व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना फलटणमधून तडीपार करा....
ReplyDeleteउत्तम कार्य फलटण पोलीस....