सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
म्हसवड :माण मतदारसंघात सन २०१४ पासून आम्ही जनतेच्या
आशीर्वादाने आमदार जयकुमार गोरेंची गुंडगिरी व हुकुमशाही मोडीत काढली
आहे.आमदार गोरेंना थांबवत त्यांना मतदारसंघातून हद्दपार करायचं हे सामान्य
जनतेच व आमचं आधीच ठरलंय. सर्वपक्षिय नेतेमंडळींच्या जे मनात आहे ते आम्ही
गेली सात वर्षे करतोय.आजपर्यंत ते कृतीतून दाखवूनही दिले आहे. आता
सर्वपक्षिय नेतेमंडळी एकत्र येऊन आमदार गोरे हटावचा नारा देत ...आमचं ठरलंय
म्हणत आहेत.पण तुम्हा सर्वांच्या मनात खरच जर आमदार गोरेंना मतदारसंघातून
हटवायचे असेल तर तुम्हीच सर्वजण या मोहिमेत सहभागी व्हावे १११ टक्के आपली
मोहीम यशस्वी होईल असे आवाहन माण खटावचे युवानेते शेखरभाऊ गोरे यांनी माण
विधानसभा मतदारसंघातील नेतेमंडळींना केले आहे.
माण
विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर आमदार जयकुमार गोरे
यांच्या विरोधात सर्वपक्षिय नेतेमंडळींनी एकत्र येऊन आमचं ठरलंय ...म्हणत
आमदार गोरे हटाव मोहिमेचा नारा दिला आहे .या पाश्वर्वभूमीवर शेखरभाऊ गोरे
यांनी कुळकजाई ता.माण येथे पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळी ते बोलत
होते.
शेखरभाऊ गोरे म्हणाले ,आमदार जयकुमार गोरेंची
सन २००९ पासूनची गुंडगिरी व हुकुमशाही प्रवृत्ती सामान्य जनतेने पाहिली
आहे.अनेकांना त्याचा फटकाही बसला आहे.ज्यांनी त्यांना निवडणूकीत मदत केली
त्यांनाही या बहाद्दराने सोडले नाही.जाणीवपूर्वक बोगस तक्रारी करून
त्यांच्यामागे ससेमिरा लावून अनेकांना त्रासच देण्याचा त्यांनी जणू विडाच
उचलला होता.मी राजकारणात सक्रिय झाल्यानंतर
वाईट
प्रवृत्तीच्या व्यक्तीची दहशत , गुडंगिरी कमी करायची या हेतूने लक्ष देत
प्रसंगी अंगावरती केसेस घेत त्यांची गुंडगिरी मोडीत काढली आहे.त्यांच्या
जाचातून सामान्य जनतेला बाहेर काढण्याचे काम करून दाखवल्यानेच आज
सर्वसामान्य जनता मोकळा श्वास घेत आहे.
सर्वसामान्य
जनतेचा विश्वासघात करत चूकीच्या मार्गाने राजकारण करणाऱ्या आमदारांसारख्या
अपप्रवृत्तींना वेळीच थांबवणे गरजेचे होते.म्हणूनच आपण त्यांची गुंडगिरी
दहशत जसी हद्दपार केली तशीच आमदार जयकुमार गोरे यांनाही मतदारसंघातून
हद्दपार करण्याचा निर्धार केला आहे.त्यांना हद्दपार करण्याची आमची मोहीम
गेली सात वर्षे चालू आहे.पाच वर्षात बहुतांश सत्तास्थाने ताब्यात घेत
त्याच्या राजकीय कारकिर्दीला सुरूंग लावण्याचे काम केले आहे.ती मोहीम अगदी
शेवटच्या टप्प्यात आली असून ७५ टक्के काम आम्ही पूर्ण केले आहे.आता राहीलेय
ते फक्त २५ टक्के काम.जर सर्वपक्षिय नेतेमंडळी याच मुद्द्यावर एकत्र आलेत
तेही या मोहिमेत सहभागी झाले तर उर्वरित २५ टक्के काम एकजूटीने पूर्ण करून
वाईट अपप्रवृत्तींच्या आमदारांना मतदारसंघातून कायमचेच हद्दपार करूयात
असेही त्यांनी आवाहन केले आहे.
सन २०१२ पासून
राजकारणात सक्रिय झाल्यानंतर स्वकष्टातून कमावलेल्या पैशांतून काही हिस्सा
जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी खर्च करायचा या हेतूने स्वखर्चातून कामे
सुरू केली.त्यादरम्यान आमदार गोरेंची गुंडगिरी ,दहशत , हुकुमशाही पध्दत
अनुभवली.या गुंडगिरीला ,दहशतीला सर्सामान्य जनता त्रासलेली होती.त्याची हीच
दहशत गुंडगिरी मोडीत काढण्याचा निर्धार करून मैदानात उतरलो होतो.सन २०१४
ला त्याच्याविरोधात निवडणूकही लढलो. आमदार गोरेंना शह देत माण तालुक्यातील
खादी ग्रामोद्योग ,खरेदी विक्रि संघ ,विविध ग्रामपंचायती , सोसायट्यांत
वर्चस्व मिळवून दिले.मार्केट कमिटी समान सोडली.तर जि.बँकेच्या निवडणूकीत
स्व.पोळ तात्यांसाठी पदरमोड करून कोट्यावधी रूपये घालवले.जि.प.पं.स.निवडणूक
प्रतिष्ठेची करत त्यातही यश मिळवले.म्हसवड नगरपालिकेत आमदार गोरेंच्या
वर्चस्वाला सुरूंग लावत सत्ता परिवर्तन घडवत आमदारांचे माण मतदारसंघात
पानिपत केले आहे.

1 Comments
KING 111
ReplyDeleteONLY SHEKHARBHAU