Hot Posts

6/recent/ticker-posts

कोरेगाव पंचायत समितीचा राज्यात डंका



सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
...................................................
कोरेगाव : राज्यातील अत्युत्कृष्ट जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवड करण्यासाठी यशवंत पंचायत राज अभियान पुरस्कार दिले जातात. 2018-19 च्या पुरस्कारांमध्ये संपूर्ण पुणे विभागातील म्हणजेच पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या पाच जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांमधील स्पर्धेमध्ये कोरेगाव पंचायत समितीने संपूर्ण पुणे विभागात तृतीय क्रमांक पटकावून धवल यश मिळवले आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी शरद मगर यांनी दिली.
 या यशाबद्दल गटविकास अधिकारी,  सभापती राजाभाऊ जगदाळे, उपसभापती संजय साळुंखे सर्व सदस्य सर्व सहकारी कर्मचारी अधिकारी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
यशवंत पंचायत राज अभियान गेली अनेक वर्षे राज्यात राबवले जात आहे. त्यामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी राज्य स्तरावर आणि विभाग स्तरावर पारितोषिके दिली जातात. त्यामध्ये 2018-19 चे यशवंत पंचायत राज अभियान निकाल नुकताच जाहीर करण्या साठी त्याबाबतची बैठक आयुक्त कार्यालय पुणे येथे 15 जुलै रोजी झाली.
या निकालानुसार सांगली जिल्ह्यातील कडेगाव ने प्रथम क्रमांक, कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्याने, द्वितीय तर सातारा जिल्ह्यातील कोरेगाव पंचायत समितीने तृतीय क्रमांक पटकावला.
हे यश संपूर्ण टीमचे आहे अशा भावना सभापती, उपसभापती आणि गटविकास अधिकारी यांनी व्यक्त केल्या. तसेच यापुढेही कामगिरी सातत्याने चालू राहील, असा विश्वास व्यक्त केला सर्व कर्मचारी अधिकारी मन लावून काम करत असल्याने हे यश मिळाले अशा भावना सभापती  राजाभाऊ जगदाळे यांनी व्यक्त केल्या. लोकाभिमुख प्रशासन आणि उत्कृष्ट पदाधिकारी यांचे जर समन्वय असेल तर असे यश मिळते आणि हे यश मिळवणे कठीण असले तरी निश्चितच आव्हानात्मक होते. असेच यश आपण मिळवत राहू शासनाच्या जास्तीत जास्त योजना कल्पकतेने समाजापर्यंत पोहोचत राहू अशा भावना गटविकास अधिकारी शरद मगर यांनी व्यक्त केल्या.
तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे आणि जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. त्यामुळे हे यश मिळाले, असे सभापती उपसभापती आणि गटविकास अधिकारी यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments