Hot Posts

6/recent/ticker-posts

औंध परिसरात चोरटयांचा आल्यावर चोरटयांचा डल्ला



सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क
औंध
मागील काही दिवसात आल्याचे दर वाढल्याने   औंध परिसरात आले चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. औंध,वडी,कळंबी परिसरातील शेतांमधून लाखो रुपये किंमतीच्या आल्यावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे.
          याबाबत अधिक शेतकऱ्यांनी दिलेली माहिती अशी की यापूर्वी चोरटे लक्ष ठेवून घरांना किंवा दुकानांंना लक्ष करून चोरी करीत होते. त्यामुळे काही गावात रात्रगस्त किंवा पोलीस पथकांची फेरी यामुळे धास्तावलेल्या चोरट्यांनी चोरी करण्याची नवीन पध्दत अवलंबली आहे. त्यांनी आपला मोर्चा शेतीकडे वळवला आहे. रात्रीच्या वेळी शेतात राखण करण्यासाठी कुणीही नसते नेमक्या याच बाबीचा फायदा घेऊन शेतातील शेतमालावर हात मारण्याचा नवा फंडा चोरट्यांनी अवलंबला आहे.
        सध्या बाजारात बियाण्याच्या आल्याचे दर गाडीला ४२ ते ४५ हजार रुपये तर मार्केटला विक्रीसाठी३७ ते ४० हजार रुपयांच्या दरम्यान आहेत.  आल्याचे दर तेजीत असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. मात्र चोरटे रात्रीच्या अंधारात अंदाजे दोनशे ते तीनशे किलो आल्यावर रातोरात हात मारीत आहेत. सध्याच्या बाजारभावानुसार अंदाजे 35ते 37 हजार किमतीच्या शेतमालाची चोरी केली जात आहे. अशा पध्दतीच्या तीन चार घटना घडल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. वडी येथे यापूर्वी शेतातून आले चोरून नेहण्याच्या दोन घटना घडल्या आहेत. राजाराम एकनाथ येवले यांच्या "ढबी" नावाच्या शिवारातील आल्याच्या पिकावर सुरवातीला चोरट्यांनी डल्ला मारला तसेच त्यानंतर दादासो किसन येवले यांच्या शेतातील दोन बेडवरील अंदाजे तीनशे किलो आल्याची चोरी झाली होती.दरम्यान काल औंध येथील गणेश देशमुख यांच्या औंध- खरशिंगे रोडवरील न्हाव्याचे माळ शेतातील आल्यावर चोरट्यांनी डाव साधला. अंदाजे वीस फूट लांबीचे तीन बेड खोदून जवळजवळ तीनशे किलो आले चोरट्यांनी चोरून नेले आहे. ही घटना ताजी असतानाच औंधमधीलच अशोक यादव यांच्या शेतातून देखील अशाचप्रकारे आल्याची चोरी झाली आहे. आतापर्यंत अंदाजे एक ते दिड टन आले चोरट्यांनी चोरून नेले आहे. यामुळे शेतकऱ्यांना सुमारे साडे तीन लाखाचा फटका बसला आहे.

Post a Comment

0 Comments