सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
........................................
सातारा : सातारा- विधानसभेची निवडणूक जवळ आली की अनेकांना आमदारकीची स्वप्ने पडू लागतात. आज अखेर सातारा- जावलीतील जनतेसाठी एका रुपयाचेही काम केले नाही अशा अमित कदमांना सत्तेची लालसा सुटल्याने मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर कधीही तोंड न उघडलेले कदम आता परिवर्तनाची भाषा करु लागले आहेत. सत्तेसाठी हपापलेल्या अमित कदमांचे मतदारसंघातील योगदान तरी काय? असा खोचक सवाल सातारा नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते व जेष्ठ नगरसेवक अशोक मोने यांनी केला असून सातारा- जावली मतदारसंघात विकासाचा झंजावात करुन मतदारसंघाचा कायापालट करणारे सर्वसामान्य जनतेचे लाडके नेतृत्व आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले हेच सातारा-जावलीचे लोकप्रतिनिधी असणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असा ठाम विश्वासही मोने यांनी यानिमीत्ताने व्यक्त केला आहे.
सातारा-जावली विधानसभा मतदारसंघामध्ये आमचे नेते आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विकासकामांच्या जोरावर जनतेचा विश्वास संपादन केला आहे. त्या विश्वासातूनच सातारा आणि जावलीतील जनतेने आ. शिवेंद्रसिंहराजे यांना भरभरुन प्रेम आणि आपुलकी दिली असून त्यामुळेच आ. शिवेंद्रसिंहराजेंनी आमदारकी मिळवली आणि त्याच विश्वासाने ती टिकवली देखील आहे. कोणाला कोणत्या घरात जन्माला घालायचे ही त्या परमेश्वराची इच्छा. मात्र राजघराण्यात जन्माला येवूनही आपल्या मनमिळावू स्वभाव, लोकांमध्ये मिळून मिसळून राहणे, तळागाळापर्यंत असणारा त्यांचा जनसंपर्क, प्रामाणिकपणे काम करण्याची वृत्ती आणि जनतेप्रती असलेली बांधीलकी यामुळे त्यांनी सर्वांचीच मने जिंकली आहेत. प्रत्येकाच्या सुखदुख:त समरस होवून प्रत्येकाच्या अडीअडचणीच्या प्रसंगी धावून जाणार्या त्यांच्या स्वभावाची पारख सातारा व जावलीतील जनतेने केलेली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूकीत कोणीही कितीही आटापिटा केला तरी, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले हेच सातारा जावली मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी असतील, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.
आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या विषयी टिका टिप्पणी करणे एवढेच काम करणार्या अमित कदमांचे आजवरचे कर्तृृत्व काय? असा सवाल उपस्थित करतानाच सातारा शहरातील असो किंवा सातारा आणि जावली तालुक्यातील कोणत्या प्रश्नात लक्ष घालून तो सोडवण्याचा प्रयत्न केल्याचे एकतरी उदाहरण कदम अथवा त्यांच्या बगलबच्यांनी द्यावे. सातारा शहराच्या पाणी प्रश्नात, स्वच्छतेच्या प्रश्नात, एमआयडीसीमधील प्रश्नात, सामाजिक एकोपा असो किंवा अन्य कुठल्या सांस्कृतिक कार्यतला प्रश्न असो यात किती योगदान दिले आहे, हे कदम यांनी एकदा स्पष्ट करावे आणि मगच परिर्वतन आणि बदल अशा ङ्गुशारक्या माराव्यात. सातारा, जावलीतील विविध विकासकामे अथवा ऊस उत्पादक शेतकरी वर्गाच्या प्रश्नांबाबत कदम यांना कितपत जाण आहे हा तर संशोधनाचाच विषय ठरेल. या सर्व प्रश्नांसह मतदारसंघातील सर्व प्रकारच्या समस्या स्वत: लक्ष घालून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी शासनाकडे ठोस पाठपुरावा करुन सोडवल्या आणि मतदारसंघाचे नाव राज्यात अग्रणी ठेवले आहे.
अमित कदम यांना भाजप मध्ये जावून दोन वर्ष झाली पण, त्यांच्या माध्यमातून सातारा, जावली सोडाच स्वत:च्या जिल्हा परिषद गटात तरी एखादे काम झाले आहे का? उलट विरोधी पक्षाचे सरकार असतानाही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मिळवून दाखवला आहे. खरे तर, परिवर्तनाची भाषा अमित कदमांच्या तोंडी येणे हे खोटापडेपणाचे लक्षण आहे आणि हे ङ्गक्त सत्तेसाठी चालले आहे, हे जनतेलाही माहिती आहे. जिल्हा परिषदेला ज्यांनी निवडूण आणले त्यांच्याशीच कदमांनी गद्दारी केली होती हे सर्वश्रुत आहेच. त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूकीत तुमच्याच उमेदवारांचा दारुण पराभव का झाला, याचे उत्तर कदमांनी द्यावे आणि मगच आमच्या नेत्यांविषयी बोलावे, असेही मोने यांनी म्हटले आहे.
दुसर्यांवर घराणेशाहीचा आरोप करणार्या कदमांनी आत्मपरिक्षण केले पाहिजे. त्यांचे वडील कै. गेणू कदम हे दहा वर्ष आमदार होते. मातोश्री आशालता कदम या जिल्हा परिषद सदस्या, महिला व बाल कल्याण समिती सभापती आणि जिल्हा बँकेच्या संचालिका होत्या तर, सत्तेच्या हव्यासापोटी अमित कदम पंचायत समितीला जावली सोडून महाबळेश्वरमधून उभे रहायचे. पुढे जिल्हा परिषदेला जावलीतून उभे राहून सभापतीपदही भोगायचे. मग त्यावेळी त्यांना वडिलांबरोबर काम करणार्या कार्यकर्त्यांची अथवा अन्य सर्वसामान्य कार्यकर्त्याची आठवण आली नाही. आताही विधानसभेला गुडघ्याला बाशिंग बांधणार्या अमित कदमांनी जावली बँकेचे माजी चेअरमन योगेश गोळे, भाजपाचे नेते रविंद्र परामणे अथवा अन्य कार्यकर्त्याचे नाव घोषीत करुन मनाचा मोठेपणा दाखवून दिला असता तर त्यांनी केलेल्या घराणेशाहीच्या आरोपात काहतरी तथ्य आहे, असे म्हणता आले असते. सुर्याकडे बोट दाखवणे ङ्गार सोपे असते पण, सुर्यासारखा प्रकाश पसरवणे खूप अवघड असते, याचे भान कदमांनी ठेवले पाहिजे. आमदारकीच्या स्वप्नापायी सातारमध्ये जेवणावळी घालून युवावर्गाचे भवितव्य बरबाद करु पाहणार्या अमित कदमांनी परिवर्तनाची दिवास्वप्ने पाहू नयेत, असेही मोने यांनी म्हटले आहे.
सत्ता आणि पदांच्या जोरावर घर भरण्याचा उद्योग
घरात सत्ता व पदे असूनही अमित कदम यांनी सामाजिक विकास न करता स्वत:चे घर भरण्याचेच उद्योग केले आहेत. सातारा- जावलीतील विकासाचे तर सोडाच पण, बेरोजगारांना रोजगार देण्याचे कामही त्यांना कधी जमले नाही. मातोश्री सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक असताना किती लोकांना रोजगार मिळाला, हेही कदमांनी स्पष्ट करावे, असेही अशोक मोने यांनी पत्रकात म्हटले आहे.

0 Comments