सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
........................................
सातारा : मुंबई येथे जलसंपदामंत्री गिरीषजी महाजन यांच्या अध्यक्षतेखाली व पालकमंत्री, जलसंपदा राज्यमंंत्री विजयबापू शिवतारे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये माण व खटाव तालुक्यातील माण व खटाव तालुक्यातील 32 गावांना टेंभू योजनेततून पाणी देणे तसेच, टँकरग्रस्त व छावणीग्रस्त गावांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी खटाव तालुक्यातील एनकुळ, खातवळसह 16 गावांना नेर धरणातून दरूज,दरजाई तलावातून 27 एमसीएफटी पाणी तर माण तालुक्यातील मार्डीसह शिंगणापूरसह 35 गावांना आंधळी धरणातून 60 एमसीएफटी पाणी राखीव ठेवण्यास बैठकीस तत्वतः मान्यता देण्यात आली.
दरम्यान, माण व खटाव तालुक्यातील गावांना टेंभूमधन शेतीसाठी पाणी देण्यासाठी सुध्दा सकारात्मक भूमिका घेण्याचा निर्णय झाला.
यावेळी माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर, पिंपरी-चिंचवड प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाभाऊ खाडे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, भाजपा सातारा जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई, शिवसेना नेते रणजित देशमुख, युवा नेते डॉ. संदीप पोळ, बाळासाहेब सावंत यांच्यासह कृष्णा खोरेचे मुख्य कार्यकारी अधिकारी खलील अन्सारी, जलसंपदाचे अधिक्षक अभियंता विजय घोगरे, टेंभूचे अधिक्षक अभियंता गुणाले, जलसंपदाचे अधिक्षक अभियंता डोईफोडे व राज्य शासनाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. या निर्णयामुळे खटाव-माण तालुक्यातील जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.

0 Comments