सातारा :
सातारा जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपा नेते दीपक साहेबराव पवार यांची
महाराष्ट्र राज्य विकास महामंडळ अध्यक्षपदी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवड केली असून दीपक
पवार यांच्या रुपाने सातारा जिल्ह्याला आणखी एक राज्यमंत्रीपद मिळाले आहे.
दीपक पवारांच्या निवडीमुळे जावली तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले
आहे. माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्यानंतर जावली तालुक्याला पुन्हा एकदा
लाल दिवा मिळाला आहे.
दीपक पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस तसेच महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय
म्हणून ओळखले जातात. सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी आ.
शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषिकांत शिंदे यांचा पराभव करीत जिल्हा परिषद
सदस्य म्हणून निवडून येण्याची हॅट्रिक साधली होती. जिल्ह्यात भाजपचा आक्रमक
चेहरा म्हणून ते ओळखले जातात. याचीच पोचपावती म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दीपक पवार यांची महाराष्ट्र
राज्य विकास महामंडळ अध्यक्षपदी निवड केली आहे. दीपक पवार यांच्या या
निवडीमुळे भारतीय जनता पक्षाची जिल्ह्यातील ताकद वाढलेली आहे. दीपक पवार
यांच्या निवडीमुळे जावली तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

0 Comments