Hot Posts

6/recent/ticker-posts

फलटणला स्वाईन फ्लू संशयित्यांची तपासणी


 सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क 
फलटण  : फलटण तालुक्यात  स्वाईन फ्लू या संसर्गजन्य आजाराने डोके वर काढले असून, आतापर्यंत पाच संशयित रुग्ण आढळले आहेत या मुळे ग्रामीण भागातील लोक भयभीत झाले आहेत मात्र कोणीही घाबरून न जाता तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेऊन विश्रांती घ्यावी असे आवाहन प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.एम.जगदाळे यांनी केले आहे.
 आज फलटण तालुक्यातील तरडगाव 13, गिरवी 9, बरड 11, साखरवाडी 25 , बिबी 0, राजाळे 10,फलटण उपजिल्हा रुग्णालय 30 ते 40 अशा सर्दी व ताप असणारे संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून हा आजार बळावण्यासाठी कुठेतरी रिमझिम अथवा मध्यम स्वरूपात पाऊस पडतो आहे तर कुठे ढगाळ वातावरणामुळे सुद्धा लोक आजारी पडत असतात या मुळे शक्य असलेस खाजगी अथवा सरकारी रुग्णालयात भेट देऊन आपल्या तपासण्या करून घ्याव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.
 
सरकारी दवाखान्यात स्वाईन फ्लूची बाधा झालेला एक रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच संशयित चार जणांना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. या आजाराबाबत सतर्क राहण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे.

Post a Comment

0 Comments