सातारा- लातूर महामार्गाचे काम शिवसेनेने बंद पाडले - सत्य सह्याद्री

ठळक

Sunday, July 14, 2019

सातारा- लातूर महामार्गाचे काम शिवसेनेने बंद पाडले



सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
........................................
म्हसवड :   सातारा - लातूर महामार्गाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे सुरू आहे. हे काम घेतलेल्या ठेकेदाराची मनमानी सुरु असून या मनमानीला माणच्या एका राजकारण्याचा वरदहस्त आहे. त्यामुळे  ठेकेदार तक्रारींना उडवाउडवीची उत्तरे देत आहे. या कामाच्या अनेक तक्रारीचा पाढा गोंदवले शिवसेना विभाग प्रमुख अमित कुलकर्णी यांच्याकडे ग्रामस्थांनी करताच त्यांनी मनकर्णवाडी (लोणार वस्ती) येथे सुरू असलेले काम बंद पाडत काम चांगल्या दर्जाचे करा. असले निकृष्ट काम माणवासीयांच्या माथी मारुन  पोबारा केल्यास गाठ माझ्याशी आहे, असे खडे बोल कुलकर्णी यांनी सुनावले.
महामार्गाचे सध्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. स्थानिक नागरिकांकडून शिवसेना गोंदवले विभागप्रमुख अमित कुलकर्णी यांच्याकडे तक्रारी येताच त्यांनी घटनास्थळी जाऊन त्यांनी सर्व परीस्थितीची पाहणी केली असता काम निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याचे दिसून आले.  कंपनीच्या कामगारांनी कच्च्या सिमेंटचा थर लोडरच्या साहाय्याने तयार करून त्यावर रोलर फिरवून दुसर्‍या दिवशी लगेच काँक्रिट करून काम संपवायचा प्रयत्न सुरु होता. परंतु, अमित कुलकर्णी यांनी सुपरवायझर व इंजिनिअर यांना जागीच झापले व पूर्ण काम बंद पाडले कुलकर्णी यांनी कंपनीच्या कर्मचार्‍यांना स्पष्टपणे सांगितले. माझ्या विभागात जर निकृष्ट दर्जाचे काम झाले तर कंपनीच्या कामगारांना काम करू देणार नाही. तद्नंतर सबंधित कंपनीने काम बंद ठेवले.

No comments:

Post a Comment