वाई
तालुक्यातील पंचायत समितीच्या गणातून वाईचे कर्त्यव्यदक्ष तहसीलदार रणजीत
भोसले व वाई पंचायत समितीचे गट विकास अधिकारी उदय कुसुरकर यांनी वाई
तालुक्यांतील गावांगावांमध्ये कोरोनो या रोगाने गतीने धुडगूस घालत असल्याने
प्रत्येक पंचायत समिती गणामध्ये तातडीच्या दररोज बैठकांचा सपाटा सुरु केला
असून या गणांच्यामध्ये येणा-या सर्व गावातील ग्रामरक्षक समिती , पोलीस
पाटील, गावकामगार तलाठी, सर्कल, आरोग्यरक्षक, आशाताई आणि भरारी पथकातील
सर्व प्रमुख अधिकारी यांची संयुक्त बैठकांचे आयोजन करून प्रत्येकाने
आपापल्या गावातील पुणे, मुंबई यासारख्या शहरातून व इतर राज्यातून येणा-या
नागरिकांच्यावर गटतट विसरून निपक्षपातीपणे प्रत्येकाला संस्थात्मक
विलगीकारण करणे गरजेचे आहे हे नमूद केले. यामध्ये जाणीवपूर्वक दुर्लक्ष
केल्यास गावांच्यामध्ये कोरोनो रोगाचा संसर्ग पसरू शकतो हे डोळ्यासमोर
ठेवून आपल्याला एकत्रितपणे गावच्या सुरक्षा धोक्यात येवू नये व त्यापासून
कोठलाही नागरिक दगावू नये याची काळजी घेण्यासाठी जिल्हाधिका-यांनी
ग्रामरक्षक समितीला स्वतंत्र अधिकार दिले आहेत. त्या अधिकाराचा वापर करून
गावामध्ये कोरोनो रोगाचा फैलाव होऊ नये या जबाबदारीची गांभीर्याने दखल
घेवून सर्वांनी काम केल्यास कोरोनोची साखळी तोडण्यास आपल्या सर्वाना
नक्कीच यश येईल .गावामध्ये मास्क न लावता आणि अनावश्यक वाहनांवर डबल सिट
फिरताना दिसल्यास भेधडक कारवाई करण्यात यावी अशी प्रशासनाला अपेक्षा आहे.
कारवाई करताना कोणी अरेरावीची भाषा वापरत असेल तर त्याच्यावर ताबडतोब
गुन्हे दाखल करावेत . यासाठी प्रशासन प्रत्येक गावाच्या ग्रामरक्षक
समितीच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. तरी ग्रामरक्षक समितीने प्रशासनाला
सहकार्य करून कोरोनोची साखळी तोडण्यास मदत करावी असे आवाहन वाईचे तहसीलदार
रणजीत भोसले यांनी ओझर्डे गणाच्या बैठकीत बोलताना केले.
जिल्हाधिका-यांनी
नागरिकांची अडचण लक्षात घेऊन लॉकडाऊन शिथिल केलेल होते त्याचा गैरफायदा
घेवून नागरिकांनी वाई शहरासह आपापल्या गावांच्यामध्ये प्रशासनाने घालून
दिलेल्या नियमांचे उल्लंघन करून सोशल डीस्टन्सिंग चा वापर न करता वाई
शहरासह गावागावामध्ये गर्दीचा महापूर तयार केला त्यामुळे पुणे मुंबई व
परराज्यातील लोकांनी याचा गैरफायदा घेवून विनापरवाना गावागावामध्ये
जिल्हाबंदीचे उल्लंघन करून चोरून वास्तव्य करण्यास सुरुवात केल्याने व
प्रत्येक गावांच्या ग्रामरक्षक समित्यांनी शिथिलतेचा गैरफायदा घेवून या
गंभीर विषयाकडे डोळेझाक केल्याने व बाहेरून आलेल्या नागरिकांच्यावर कारवाई न
केल्यामुळे व प्रशासनाने दिलेल्या अधिकाराच्या कारवाईकडे गंभीरपणे न
बघितल्याने परगावाहून आलेले नागरिक राजरोसपणे घरात राहून गावांमध्ये व
शहरात फिरण्यात मग्न झाले होते . अश्या लोकांच्यावर वेळीच कारवाई झाली असती
तर आज कोरोनोसारख्या रोगाचा गावोगावी फैलाव झाला नसता. असे यावेळी बोलताना
तहसीलदार रणजीत भोसले म्हणाले
चौकट : दंडाची रक्कम न भरल्यास मिळकतीवर बोजा दाखल होणार
विनामास्क
फिरताना आढळल्यास, दुचाकीवर डबलसिट दिसल्यास, कंटेनमेंट झोनबाहेर फिरताना
आढळल्यास अश्या व्यक्तींवर पहिल्यांदा ५०० तर दुस-यांदा १००० रुपये दंड
वसूल करावा व अश्या लोकांनी दंड भरण्यास नकार दिल्यास त्यांच्या मिळकतीवर
सदर दंडाच्या रकमेचा बोजा चढविण्यात यावा. तिस-यांदा सदर व्यक्ती पुन्हा
दंडात सापडल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत अश्या सुचना
यावेळी तहसीलदार रणजीत भोसले यांनी दिल्या
फोटो : ओझर्डे गण बैठकीत बोलताना गट विकास अधिकारी उदय कुसुरकर व तहसीलदार रणजीत भोसले
| dd caption |

0 Comments