Hot Posts

6/recent/ticker-posts

वाई तालुक्यातील संतोष देशमुख यांच्या एकसर येथील स्वस्त धान्य दुकानावर जिल्हा पुरवठा अधिका-यांची धडक कारवाई

 

वेळे 

वाई तालुक्यात ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा वाईचे तालुकाध्यक्ष दादासाहेब काळे यांनी पुढाकार घेवून त्यांच्याकडे आलेल्या एकसर ता. वाई येथील स्वस्त धान्य दुकानदारांच्या तब्बल ४० कुटुंबाना शिधापत्रिकेवरील धान्य न दिल्याने त्याचा पाढा जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा शाखेकडे वाचल्याने  एकसर येथील स्वस्त धान्य दुकान रद्द करण्याचे लेखी आदेश जिल्हा पुरवठा अधिका-यांनी दिल्याने  एकसर गावामधील शिधापत्रिकाधारकांना न्याय मिळाल्याने गावामध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. सविस्तर वृत्त असे की 
एकसर ता. वाई येथील नागरिकांसाठी स्वस्त धान्य पुरवठा करण्यासाठी संतोष दत्तात्रय देशमुख यांच्या रेशन दुकानामार्फत गेले कित्येक वर्ष धान्य वाटपासाठी नेमणूक केली होती. तेथील नागरिकांचा गैरफायदा घेवून धान्य दिलेल्या पावतीपोटी १० रुपये मागणे, शिधापत्रिकेमध्ये नोंद असलेल्या एकूण युनिटनुसार धान्य न देणे, धान्याचा गेले १० वर्षापासून काळाबाजार करणे, धान्याचे वाटप केल्यानंतर शिधापत्रिकेवर नोंद न करणे, दुकानामध्ये दरफलक व तक्रार पेटी न ठेवणे, युनिटनुसार धान्य न देणे, अपंग व्यक्तींना धान्याचा पुरवठा न करणे, साखरेचे पैसे घेवून साखर न देणे, शिधापत्रिका धारकांना धान्य मिळाले नसताना देखील धान्य दिल्याची शिधापत्रिकेवर नोंद करणे, विभक्त कार्ड येत नसल्याबाबत चुकीची उत्तर देणे, २०१४ पासून अनेकजण धान्यापासून वंचित ठेवणे, लॉकडाऊन काळातील माहे एप्रिल महिन्याचे धान्य संपले आहे असे सांगून गी-हाईकांना हाकलून देणे,शासनाने मोफत धान्य वाटपाचे आदेश दिलेले असताना त्यात काट छाट करून लहरीनुसार धान्य देणे व धान्य दिल्याची छापील पावती न देणे, या स्वस्त धान्य दुकानातून काळ्या बाजाराने गहू १० रुपये किलोने व तांदूळ २० रुपये किलोने विकणे. अश्या असंख्य तक्रारींचे सह्यांचे निवेदन एकसर ता. वाई येथील ग्रामस्थांनी तयार करून त्यांनी वाई येथील ग्राहकपंचायत महाराष्ट्र शाखेचे तालुकाध्यक्ष असलेले दादासाहेब काळे, तहसीलदार वाई , जिल्हाधिकारी सातारा यांना पाठविले होते. या तक्रारीची दखल वाईचे तहसीलदार रणजीत भोसले यांनी घेवून त्याच्या चौकशीसाठी एकसर गावामध्ये गावकामगार तलाठी व सर्कल ऑफिसर यांना पाठविले होते. पण या चौकशी अहवालातून एकसर गावाच्या नागरिकांचे समाधान न झाल्याने व आमच्यावर अन्याय होत आहे , त्याला तहसीलदार वाचा फोडत नाहीत असा आत्मविश्वास तयार झाल्याने याची तक्रार ग्राहक पंचायतीकडे केली होती. त्यावेळी ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष दादासाहेब काळे यांनी स्वतः जातीने लक्ष घालून जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा पुरवठा अधिकारी असलेल्या स्नेहा किर्वे देवकाते यांच्या दालनात जाऊन एकसर ग्रामस्थांची व्यथा मांडून त्यांनी संतोष दत्तात्रय देशमुख या रास्त भाव दुकानदाराकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याची अनेक पुरावे सादर करून त्याची त्या दुकानातून हकालपट्टी करावी व जिल्हा पुरवठा अधिका-यांच्या शाखेतील सक्षम अधिका-याची नेमणूक करून त्या गावाला समक्ष भेट देवून नागरिकांच्या व्यथा ऐकाव्यात अशी मागणी केली होती. ती मागणी जिल्हा पुरवठा अधिका-यांनी मान्य करून अचानक तपासणी पथक तयार करून एकसर गावात पाठविले होते . त्यावेळी संबंधित पथकाने गावात जाऊन अन्यायग्रस्त शिधापत्रिका धारकांची समक्ष  भेट घेवून व्यथा जाणून घेतल्या व दुकानाची तपासणी केली असता गहू ३३ किलो , तांदूळ २२ किलो , व मोफत तांदूळ ७५ किलो यासह  एकूण गहू ९९ किलो, तांदूळ ५६ किलो व मोफत तांदूळ १७० किलो रेकॉर्डनुसार तपासणीमध्ये तफावत असल्याचे आढळून  आल्याने त्याचा अहवाल तयार करून जिल्हा पुरवठा अधिका-यांच्यापुढे सादर करण्यात आला. या प्रकारची त्यांनी गंभीर दखल घेवून धान्य घोटाळा सिद्ध झाल्यानंतर स्वस्त धान्य दुकानदाराकडून लंपास केलेल्या धान्याचे चालू बाजार भावाने होणारी किंमत तहसीलदार वाई यांनी वसूल करून ती योग्य त्या चलनाने शासनाच्या तिजोरीत जमा करून घ्यावी असे गंभीर  आदेश काढले. त्याचप्रमाणे तहसीलदार वाई यांनी सदरचे दुकान बंद करून नजीकच्या व सोयीच्या अन्य दुकानास एकसर गाव तत्काळ जोडण्याबाबतचे आदेश दिले आहेत. त्यापद्धतीने दुकानदार संतोष देशमुख याचे एकसर गावचे  दुकान बंद करण्यात आले आहे. त्याच्याकडून चालू बाजारभावाप्रमाणे तहसीलदार वाई यांनी रक्कम वसूल केली आहे. या कारवाईमुळे वाई तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांमध्ये  खळबळ उडाली आहे व ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा वाईचे  तालुकाध्यक्ष दादासाहेब काळे यांचे एकसर ग्रामस्थांनी आभार मानले  आहेत.

Post a Comment

2 Comments

  1. सुरूर मधे असाच प्रकार अनेक दिवसा पासून सुरु असून या बाबत ऑनलाईन पोर्टल वर अनेक तक्रार दिल्या आहेत पण मागील 3 महिन्या पासून त्याची कोणीही दखल घेतली नाही त्या उलट ज्यांनी ज्यांनी तक्रारी दिल्या त्यांना अप्रत्यक्ष पणे धमकावण्याचा प्रकार होत आहॆ. कृपया मा. दादासाहेब काळे यांचा संपर्क मिळावा.
    9762010527 तेजस चव्हाण

    ReplyDelete
  2. सुरूर येथील धान्य दुकानात अशाच पद्धतीने फसवणूक होते याची ऑनलाईन तक्रार 3महिने पूर्वी दिली असून कोणीही याची दखल घेत नाहीत याउलट तक्रार दाराना अप्रत्यक्ष धमकावणे सुरू आहॆ कृपया मा. दादासाहेब काळे यांचा संपर्क क्रमांक मिळावा.

    ReplyDelete