![]() |
| -मल्हारपेठ-पंढरपूर रस्त्यावरील वाहून गेलेला कच्चा पूल |
![]() |
-चांदणी चौक पुलावर आलेले प्रचंड पाणी |
सतीश डोंगरे/. सत्य सह्याद्री ऑनलाईन
मायणी व परिसरात पावसाचा जोर वाढल्याने चांद नदीला वाढलेल्या पाण्याच्या दाबाने मल्हारपेठ-पंढरपूर या राज्य महामार्गावरील भवानीदेवीमंदिर परिसरालगत च्या कच्चा पूल पुन्हा एकदा वाहून गेला. हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला होता.मध्यरात्री जोरदार पाण्याच्या दाबाने हा पूल वाहून गेला असून कलेढोण ,म्हसवड,पंढरपूर कडे जाणारा वाहतुकीचा पुन्हा मार्ग बंद झाला आहे.
दोन दिवस मायणी, कलेढोण परिसरात जोरदार पाऊस पडल्याने मायणी येथील चांद नदीवरील भवानीदेवीमंदिर परिसर येथील कच्चा पर्यायी पूल, मुख्य बाजारपेठ व चांदणी चौक या भागाला जोडणारा पूल व लक्ष्मीनगर कडे जाणार पूल हे तिन्ही पूल अनेक वर्षातून प्रचंड अशा नदीच्या पाण्याखाली गेल्याने लोकांचा दलणवळणाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
काही दिवसापूर्वीच मल्हारपेठ -पंढरपूर रस्त्यावरील मुख्य पुलाचे काम चालू असल्याने पर्यायी मातीचा भराव पूल संबंधित ठेकेदाराने तयार केला होता परंतु तो वाहून गेल्याने तीन दिवस हा पूल वाहतुकीला बंद झाला होता तो पुन्हा मोठ्या पाईप टाकून चालू करण्यात आला होता .परंतु पुलांच्या कामाचे अयोग्य नियोजन यामुळे सर्वत्र झालेल्या प्रचंड पावसाने आज पुन्हा हा पूल मध्यरात्री वाहून गेल्याने वारंवार राज्य महामार्गावरील खंडित होणारी वाहतूक यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. पाण्याचा प्रवाह वाढल्याने नदीपात्रात कोणीही प्रवेश करू नये असे आवाहन स्थानिक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


0 Comments