Ticker

6/recent/ticker-posts

मोही गावाने जपली तालीम पैलवनकीची परंपरा

 मोही तालमीत सराव करताना पैलवान, आणि  अर्थसहाय्य करताना फौजा दत्ता भगत 
छायाचित्र --दीपकराव तंडेबडवे,शिखरशिंगणापूर



तरुणांच्या पुढाकाराने तालीम सुरू, शासनाने लक्ष देण्याची मागणी

शिखरशिंगणापूर
आज डीजे,मोबाईल,संगणक, अशी चमचम चंदेरी दुनिया मुलांना खुणावत आहे त्यामुळे व्यायाम तालीम किंवा पैलवनकी ही महाराष्ट्राची शान म्हणण्यातच अडकली आहे मात्र माण तालुक्यातील मोही गावाने तालीम पैलवनकीची परंपरा जपली तरुणांच्या पुढाकाराने तालमीची डागडुजी केली जात आहे शासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे
        मोहीतील आठ ते दहा वर्षे वयोगटातील बाल,दहा ते पंधरा चे किशोर,सोळा पासूनचे पुढील तरुण ,अशी सुमारे पन्नास संख्या दररोज सायंकाळी पाच ते सात या वेळेत दररोज गावच्या तालमीत सराव करताहेत मोहीसुपुत्र किरण भगत ने मोही सह साताऱ्याचे नव्हे तर महाराष्ट्राचे नाव जागतिक पातळीवर नेले आहे त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन मोही गावची जाणकार जेष्टमंडळी आणि तरुण सरसावले आहेत चारित्र्य संपन्न ,निर्व्यसनी गुणवान,बलशाली तरुण निर्मिती हे ध्येय मोही गावाने सध्यातरी बाळगल्याचे दिसते आहे
       या कामी देशसेवेत असणारे फौजी दत्ता भगत यांनी तालमीस घवघवीत अर्थ सहाय्य केले यावेळी गड्यां नो आता थांबायचं नाय मोहिकरांचा झेंडा महाराष्ट केसरीत फडकवायचा हाय असे सांगून नवनिर्वाचित पैलवानानां शुभेच्छा दिल्या याकामी वस्ताद बशीर शेख,दादा पाटोळे, विजय कदम, डॉ जयप्रकाश देवकर, विजय देवकर,  आदींनी पुढाकार घेऊन विशेष लक्ष दिले


Post a Comment

0 Comments