सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क/ येरळवाडी
पुणे येथील व्यवसायीकास २२ एकर क्षेत्राची विक्री करणेची आहे असे सांगुन , त्याकरीता कमिशन एजंट म्हणुन काम करुन ८८ लाखाची फसवणुक करणाऱ्या दोन आरोपींना दिडवाघवाडी व चिल्लारवाडी ता.माण येथुन ताब्यात घेणेत आले आहे . सदर गुन्हयाची थोडक्यात हकिगत अशी की , सदर आरोपी यांनी पुणे येथील एका व्यवसायीकास माण तालुक्यात जमीन गट नं ९९ ३ व ९९ ८ मधील २२ एकर शेतजमीन जमीन काही क्षेत्र विक्री करावयाची आहे असे सांगितले . तसेच सदर आरोपी यांनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन कमिशन एजंट म्हणुन काम करुन फिर्यादीची ८८ लाख रुपयेची फसवणुक केले आहे . त्याबाबत आरोपी यांचे विरुध्द म्हसवड पोलीस ठाणे गुरनं ५५/२०१७ भादवि कलम ४२०,४०६,३४ प्रमाणे सन २०१७ मध्ये गुन्हा दाखल आहे . सदर गुन्हयातील आरोपी हे गेली तीन वर्षापासुन फरार होते . त्यांना ताब्यात घेवुन म्हसवड पोलीस ठाणे यांचे ताब्यात देणेत आले आहे . सदर आरोपी यांना सदर आरोपी मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो म्हसवड यांचे समक्ष हजर केले असता मा.न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजुर केली आहे . सदर आरोपी यास मा.पोलीस अधीक्षक सो सातारा व मा.अपर पोलीस अधीक्षक सो सातारा यांचे मार्गदर्शनाखाली डॉ.निलेश वि.देशमुख , उपविभागिय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग यांनी तयार केलेल्या पथकामार्फत ताब्यात घेवुन दहिवडी पोलीस ठाणे यांचे ताब्यात देणेत आला असुन , पुढील कारवाई सपोनि भुजबळ दहिवडी पोलीस ठाणे हे करीत आहेत . सदर अटकेची पो.कॉ तानाजी चंदनशिवे , पोकॉ रमेश बर्गे , पोकॉ अनिल वाघमोडे , पो.कॉ.सुहास गाडे , पो.कॉ.गणेश पवार यांनी केली आहे

0 Comments