सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
देवापूर: देवापूरचे सुपुत्र व कृषी अधिकारी अरुण जाधव (वय 45) यांचे बुधवारी 11 रोजी त्यांचे अकलूज येथे उपचार सुरु असताना अल्प आजाराने निधन झाले. ते सध्या गडहिंग्लज येथे कार्यरत होते. मृत्यू समयी त्यांचे वय 45 होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली ,दोन विवाहित बहिणी, एक भाऊ, पुतणे असा परिवार आहे. देवापूर येेथे शुक्रवारी 8 वाजता सावडणे विधी होणार आहे.
नोकरीच्या काळात त्यांनी विशेष घटक योजनेत पंचायत समिति करमाळा, तदनंतर पदोन्नती वर देवगड तालुका कृषी अधिकारी, सांगोला तालुका कृषी अधिकारी, खटाव तालुका कृषी अधिकारी, व सध्या गडहिंग्लज याठिकाणी त्यांची नेमणूक झाली होती.1997 साली कृषी महा विद्यालय पुणे येथून कृषी पदवी घेतली. एक उमदा तरुण अधिकारी जाण्याने कृषी विभागाचे मोठे नुकसान झाल्याचे अनेक मान्यवरांनी सांगितले. शांत, सय्यमी, व मनमिळावू स्वभावा च्या तरुण अधिकार्या च्या अचानक एक्झिट ने माण सह खटाव मध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

0 Comments