सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क/मायणी
एकीकडे दिवाळी पाडव्याची धामधूम सुरू असताना येथील शिंदेवाडी रोड वरील देशमुखवस्ती लगतच्या चांद नदी पात्रातील बंधाऱ्यात अनोळखी मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.
सकाळी फिरायला गेलेल्या काही नागरिकांना हा मृतदेह दिसताच त्यांनी तातडीने यंत्रणेला कळवले. गावात हा हा म्हणता ही बातमी पसरल्यावर अनेक ग्रामस्थांनी नदीपात्रात कडे धाव घेतली. यावेळी मोठी गर्दी झाली होती. मायणी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पुढील कार्यवाही सुरू केली आहे. हा मृतदेह पुरुषाचा की स्त्रीचा हे समजू शकले नाही. मायणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
0 Comments