Ticker

6/recent/ticker-posts

शंकरराव माळी यांचा आ. गोरे यांना रामराम

वडूज: मायणी चे युवानेते शंकरराव माळी यांचा सत्कार करतांना मंत्री सतेज पाटील,
समवेत मा. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, रणजित देशमुख व इतर मान्यवर ...


वडूज /मायणी 

येथील  तरुण नेतृत्व, युवा उद्योजक आ .जयकुमार गोरे  यांचे कट्टर समर्थक शंकरराव माळी ( आबा ) यांनी आज  मायणी गटातील आपल्या  सर्व कार्यकर्त्यांसह  भारतीय जनता पार्टी व आ. गोरे यांना रामराम ठोकत राष्ट्रीय काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश केला .                                        

माजी मुख्यमंत्री आ . पृथ्वीराज चव्हाण,  गृहराज्यमंत्री ना . सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या उपस्थितीत व हरणाई उद्योग समूहाचे कुटुंबप्रमुख रणजितसिंह  देशमुख भैय्यासाहेब यांच्या नेतृत्वाखाली  माळी यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.

जयकुमार गोरे यांच्या भाजप प्रवेशावर बहुतांशी कार्यकर्ते नाराज होते भाजप मध्ये होत असलेल्या मुस्कटदाबी संपल्याची भावना काँग्रेस प्रवेशावेळी व्यक्त केली .

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मी मुख्यमंत्री असताना रखडलेल्या कामासाठी लागेल तेवढा निधी देऊन  उरमोडी योजना मार्गी लावली , उरमोडी पाणी योजना व पृथ्वी  साखळी  बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मनापासून समाधान होत आहे .
      
    यावेळी उपस्थित जिल्हाध्यक्ष डॉ . सुरेशराव जाधव  श्री . अशोक आबा गोडसे , तालुकाध्यक्ष डॉ . विवेक देशमुख , डॉ . महेश गुरव , भरत जाधव , संजीव साळुंखे ,विजयराव शिंदे , संतोष मांडवे , डॉ . बाळासाहेब झेंडे , निलेश जाधव व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते .              शंकरराव माळी यांनी चार वर्षांपूर्वी झालेल्या निवडणूकीत विद्यमान जि. प. सदस्य सुरेंद्रदादा गुदगे व त्यांचे बंधू सचिनदादा गुदगे या दोन प्रस्थापित उमेदवाराना जोरदार टक्कर दिली होती. 

Post a Comment

0 Comments