Ticker

6/recent/ticker-posts

म्हसवड यात्रा रद्द, भाविकांनी शासनाला सहकार्य करावे: प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 
शिखर शिंगणापूर
 जागतिक महामारी कोविड 19 खबरदारीचा काळ सुरू आहे कोविड शासन नियम शिथिल करण्यात आलेले नाहीत. या बाबत सवलतीचा कोणत्याही प्रकाचा शासन अध्यादेश आलेला नाही माण खटाव विभागात तुर्तास बंदी आहे. भाविकानी यात्रा जत्रा गर्दीचा अट्टहास धरू नये अन्यथा कायद्याचा वापर करावा लागेल हे टाळण्यासाठी भाविकांनी प्रशासन यंत्रणेस सहकार्य करावे असे आवाहन माणचे  प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी केले आहे.
देशात सर्वत्र लॉकडाऊन होते नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी काही नियम शिथिल करण्यात आलेले आहेत. दैनंदिन व्यवहारात देखील मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सोशल डिस्टन पाळणे आवश्यकच आहे यामध्ये कुचराई करताना कोणी आढळल्यास दंडात्मक कारवाई होऊ शकते. अजून कोविड 19 चा प्रसार कमी झालेला नाही याचे भान सर्वांनी ठेवणे आवश्यक आहे परंपरा म्हणून मंदिरातल्या मंदिरात पूजा उत्सव करावेत नगरप्रदक्षिण रथोत्सव होणार नाही याची नोंद घ्यावी.
        या पार्श्वभूमीवर गुरुवारी होणारी म्हसवड यात्रा बैठक ही रद्द करण्याची आवश्यकता होती. परंतु म्हसवड नगरीचे नागरिक यांचेशी चर्चा करून कल्पना देणे कामी बैठकीचे नियोजन आहे. आता तुम्हा सर्वांची जबाबदारी आहे. राज्यातून येणाऱ्या भाविकांना घरूनच यात्रा उत्सवसाजरे करावेत ते इथं पर्यंत येणार नाहीत असा मेसेज सर्वत्र पोहचवावा याबाबत कोणताही अनुचित प्रकार घडल्यास ती देवस्थान कमेटीची जबाबदारी असेल सर्वांनी स्वयंशिस्त पळून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन प्रांताधिकारी यांनी म्हसवड यात्रेच्या पार्श्वभूमीवर केले आहे.

Post a Comment

0 Comments