Ticker

6/recent/ticker-posts

फलटण तालुक्यातील 74 ग्रामपंचायतीसाठी 82 टक्के मतदान

फलटण प्रतिनिधी -
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत फलटण तालुक्यातील 74 ग्रामपंचायतीसाठी 82 टक्के मतदान शांततेत पार पडले असून मतदान झाले असून या मध्ये पुरुष मतदार 58828 व महिला मतदार 53402 असे एकूण 112230 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी समीर यादव यांनी दिली.
   सर्वच मतदान केंद्रावर सकाळपासून गर्दी दिसून येत होती.सर्व उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून सोमवारच्यां निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
    ग्रामपंचायत निवडणूक सण 2021-2026 साठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. या मध्ये गेली पंधरा दिवस सर्वच गावात निवडणुकीचा प्रचाराचा धुरळा उडाला होता. दरम्यान या वर्षी सर्वच गावात बंडोबाना थंड करण्यात अपयश आल्याने सर्वच उमेदवारांना या बंडखोरीचा सामना करावा लागला. तर या वर्षी सर्वांच्या नजरा लागून राहिल्या होत्या त्या पिंपळ वाडी(साखरवाडी),कोळकी,जाधववाडी(फ.),निंभोरे,राजुरी,खुंटे, जिंती,व होळ कडे या ठिकाणी मात्र यावर्षी मतदानाची टक्केवारी वाढल्याने ही टक्केवारी कोणाला तारक तर कोणाला मारक ठरणार हे निकालानंतर समजणार आहे.
   पिंपळवाडी(साखरवाडी),कोळकी व जाधववाडी(फ.)या तिन्ही गावात सकाळपासून मतदान केंद्रावर गर्दी पाहायला मिळत होती.महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सॅनिटायझर,थर्मामिटर,ची व्यवस्था करण्यात आली होती. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टनसिंग पाळून पोलीस यंत्रणेला बरोबर घेत सर्वत्र चोख बंदोबस्त व सुनियोजनामुळे शांततेत मतदान पार पडले.
    या निवडणुकीत यापूर्वी सहा गावे बिनविरोध झाल्याने 74 गावात हे मतदान पार पडले.खासकरून राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत राजे गट,व भाजप पुरस्कृत खासदार गटात ही निवडणूक झाली.तर या निवडणुकीत राजे गटात बंडखोरी उफाळून आल्याने नेत्यांना टोकाची भूमिका घ्यावी लागली होती.तर अनेक गावात राजे गटात दोन गट एकमेकांसमोर उभे ठाकून मैत्रीपूर्ण लढती सुद्धा पहायला मिळाल्या.तर कुठेही अनुचित प्रकार न घडता सर्वत्र शांततेत मतदान पार पडले.

Post a Comment

0 Comments