दि.15(वार्ताहर).
नेले , जिल्हा परिषद गटातील तसेच किडगाव पंचायत समिती गणातील तब्बल आठ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे मतदान अत्यंत शिस्तबद्ध व शांततेत पार पडले काही ठिकाणी अपवाद वगळता सर्वत्र शांततेत मतदान संपन्न झाले.
सकाळी साडेसात वाजता या मतदानाला सुरुवात झाली ग्रामपंचायतीचे मतदान असल्याकारणाने गाव पातळीवर याला महत्त्व प्राप्त असते त्यामुळे सकाळी साडे अकरा ते बारा वाजेपर्यंत मतदारांनी चांगलाच प्रतिसाद दिला मात्र दुपारी दोन नंतर मतदारांची मतदान अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना वाट बघावी लागली चार नंतर राहिलेल्या मतदारांना मतदान केंद्राकडे वळवण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांच्या बरोबर उमेदवारांची पळापळ दिसून येत होती.
किडगाव पंचायत समिती गणातील नेले याठिकाणी एकूण 1368 एवढे मतदान झाले. मतदानाची टक्केवारी 85 टक्के एवढी झाली. किडगाव येथे नऊ जागांसाठी एकूण मतदानापैकी सायंकाळी साडेपाच वाजता एकूण स्त्रिया आणि एकूण पुरुष1554 एवढे मतदान झाले. मतदानाची आकडेवारी आकडेवारी 87 टक्के एवढी झाली.कळंबे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची चुरस ही दिसून आली वर्ये निवडणुकीत चुरशीचे मतदान झाले असून 805 एवढे मतदान या ठिकाणी झाले.हमदाबाद ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत 623 पैकी 546 एवढे उच्चांकी मतदान झाले.
मतदानासाठी सकाळी रांगा दिसून येत होत्या तर कार्यकर्त्यांच्या बरोबर उमेदवारांची या परिसरात धावपळ सुरू होती जे आजारी आणि वयोवृद्ध मतदार होते त्यांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी चक्क झोळीचा वापर तसेच काही ठिकाणी सायकलचा वापरही केला गेला स्वतः कार्यकर्ते या सायकल खुर्चीत बसून मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवत होते.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये गावा-गावात चुरस दिसून आली असून या निवडणुकीचा निकाल येत्या सोमवारी पाहावयास मिळणार आहे मतदार राजा कोणाला कौल देतोय हे पाहणे आता उत्सुकतेचा विषय झाला आहे.
0 Comments