Ticker

6/recent/ticker-posts

पाडळीस्टेशन - सातारारोड ग्रामपंचायतीसाठी ७२ टक्के मतदान

सातारारोड दि.२५ ( प्रतिनिधी ) -
 पाडळीस्टेशन - सातारारोड ,ता.कोरेगाव येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी एकुण ७२ टक्के मतदान झाले. अत्यंत चुरशीची व रंगतदार अशीच येथील लढत आहेत.
         सर्व तालुक्यातील जनतेचे या निवडणुकीकडे लक्ष वेधले गेले आहे. तालुक्यातील दोन आमदारांच्या पँनेलमध्ये अटितटीची रंगतदार लढत यावेळी होत आहे. यामुळे आ.महेश शिंदे व विधान परिषदेचे आ.शशिकांत शिंदे यापैकी कोण बाजी मारणार याबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे.
       वाँर्ड निहाय झालेले मतदान पुढीलप्रमाणे वाँर्ड क्रमांक -१ जरंडा वाँर्ड झालेले मतदान १२६६ , वाँर्ड क्रमांक -२ वसना वाँर्ड झालेले मतदान १०४२ ,वाँर्ड क्रमांक -३ काँलनी वाँर्ड झालेले मतदान ६४८ ,वाँर्ड क्रमांक -४ स्टेशन वाँर्ड झालेले मतदान ७६९ , वाँर्ड क्रमांक -५ हनुमान वाँर्ड झालेले मतदान १११४ , वाँर्ड क्रमांक - ६ लक्ष्मी वाँर्ड यामध्ये झालेले मतदान ६०७ . 
           पाडळीस्टेशन - सातारारोड हि कोरेगाव तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. सहा वाँर्ड आणि सतरा सदस्य याठिकाणी आहेत. तर एकुण मतदार संख्या ७५०० एवढी आहे. दि.१५ रोजी झालेल्या ग्रामपंचायतीच्या मतदानासाठी ५४४६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.म्हणजेच एकूण ७२ टक्के मतदान झाले.
          आ.महेश शिंदे व विधान परिषदेचे सदस्य आ.शशिकांत शिंदे यांच्यातच खरी लढत झाली आहे. यापूर्वीच आ.महेश शिंदे गटाचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे आ.महेश शिंदे यांच्या गटाचे पारडे सुरवातीपासूनच जड दिसून येत आहे. अत्यंत अटितटीची व रंगतदार अशी येथील निवडणूक झाल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. अनेकांनी निकालाबाबत पैजा लावल्या आहेत.
 यावेळच्या निवडणुकीत सरपंच पदाचे आरक्षण अद्याप जाहीर करण्यात नसल्याने सरपंच पदाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कौन बनेगा सरपंच हेच वाक्य मतदारांच्या तोंडात आहे. आता वेध लागले आहेत ते निकालाचे .सर्व जनतेचे व नेते मंडळींचे लक्ष आता सोमवार दि.१८ रोजी होणाऱ्या मतमोजणी कडे आहे.

Post a Comment

0 Comments