Ticker

6/recent/ticker-posts

माण तालुक्यात सरासरी 79 टक्के मतदान

फोटो 
 १)वडजल मतदान केन्द्रवार लागलेली रांग
 २) पळसावडे येथे मतदान करताना माजी मंत्रीीी जानकर
म्हसवड प्रतिनिधी
 माण तालुक्यात 47 ग्रामपंचायतीच्या निवडणूक अत्यंत चुरशीची झाली आज सकाळपासून मतदानाला धिम्या गतीने सुरुवात झाली असली दुपार नंतर मात्र मतदानासाठी रांगा लागलेल्या दिसत होत्या सांयकाळी शेवटी ७९.७७% मतदान झाले असुन यावेळी मतदानाची वाढलेली टक्केवारी आघाडीला तारक ठरणार की भाजपाला तारक ठरणार हे सोमवारी निकालात समजणार असले तरी या निवडणुकीत भाजपाला एकटे पाडण्यासाठी राष्ट्रवादी कांग्रेस शिवसेना व राष्ट्रीय कांग्रेस व इतर पक्षांच्या कार्यकर्यानी या निवडणुका स्थानिक पातळीवर हातात घेतली तर दुसरीकडे भाजपा आ गोरे यांनी पायाला भिंगरी बांधुन प्रचारात मोठी चुरस आणली होती झाले तर या निवडणुकीत विशेषता देवापुर, रांणद, शिंगणापूर,गोंदवले, जांभुळणी, पर्यती ,संभुखेड, भालववडी या ग्रामपंचायती चुरसीची व अटीतटीची होऊं आरोप प्रत्यारोपाच्या फटाकड्याचे बॅम्ब फुटत असताना कोठे ही या निवडणुकीला गालबोट लागेल असे कृत्या झाले नसल्याने या निवडणुका शांततेत पार पडल्या 
 सकाळ पासून मतदानाला तुरळक गर्दी होती सकाळ पासुन दुपारी 1.30 पर्यत 53.46% ,दुपारी ३.३० पर्यत ६७.७७% तर सांयकाळी ५.३० वाजता ७९.७०% मतदान झाले विशेषता ग्रामपंचायत निवडणूक मध्ये कोणाची सत्ता येणार कोणाकडे बहुमत होणार माणवर कांग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या आघाडीचे वर्चस्व राहणार की भाजपाचे आ गोरे यांचे वर्चस्व या ग्रामपंचायत निवडणुकीत राहणार हे सोमवारी मतमोजणी नवीन शासकीय धान्य गोदाम दहिवडी येथे होणार आहे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे यामुळे महाविकासआघाडी बाजी मारणर की भाजपा 
माण तालुक्यात एकूण ४७ ग्रामपंचायतीची निवडणूकीत ३३६ जागेसाठी ७२४ उमेदवार या निवडणुकीत आपले भविष्य आजमावत आहेत १९२ सदस्य बिनविरोध झाले आहेत १४७ केंद्रावर मतदान केन्द्रवार निवडणुक झाली या निवडणुकीत १५१ बॅलेट युनिट तर १४७ कंट्रोल युनिट वापरण्यात आले या निवडणुकीत एक ही मशिन बंद पड़ले नहीं या निवडणुकीत १०० पोलिस कर्मचारी ७० होमगार्ड कर्मचारी तैनात करण्यात आले होते अतिसंवेदनशील मतदान केन्द्रवार स्वता एपीआय बाजीराव ढेकळे लक्ष घालत होते 

Post a Comment

0 Comments