मायणी
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत सन -2020-21 या शैक्षणिक वर्षात माध्यमिक शिक्षकांसाठी घेण्यात आलेल्या ऑनलाईन नवोपक्रम स्पर्धेत मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळ ,मायणीच्या भूतेश्वर विद्यामंदिर ,अंबवडे ता- खटाव येथील शिक्षक संदीप त्रिंबके यांची राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी निवड झाली .
संदीप त्रिंबके यांनी नवोपक्रम स्पर्धेसाठी अपूर्णांकांची संगत गणित अध्ययन अध्यापनात येईल रंगत हा उपक्रम सादर केला होता .या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा गणित विषयाचा पाया भक्कम होण्यास मदत होणार आहे . विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाची आवड निर्माण होऊन हा नवोपक्रम विद्यार्थ्यांना फायदेशीर व उपयुक्त आहे . या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन मा. श्री सुरेंद्र दादा गुदगे,संस्थापक सचिव मा. श्री .सुधाकर कुबेर सर, सर्व संचालक मुख्याध्यापक ,शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले .
0 Comments