फोटो- कातरखटाव येथे मतदारांनी मतदानासाठी रांगा लावून मतदान केले.
वडूज/प्रतिनिधी : खटाव तालुक्याच्या एकुण नव्वद ग्रामपंचायतीच्या निवडणूकीमध्ये कातरखटाव, एनकुळ, बनपुरी, बोंबाळे, येरळवाडी, डांभेवाडी, तडवळे, नायकाचीवाडी आदी गावांमध्ये किरकोळ वाद वगळता मतदान शांततेत पार पडले. कातरखटाव केंद्रावर सकाळी 7 वाजलेपासून मतदानास उत्स्फुर्तपणे सुरवात झाली. मतदान केंद्रामध्ये मोबाईल नेन्यास बंदी घातल्याने एका मतदाराने आपला मोबाईल बाहेर ठेवला होता. मतदान करुन आल्यानंतर बा/हेर मोबाईल न दिसल्याने मतदाराने दंगा केला. पोलिसांच्या सहार्याकार्याने हा वाद मिटविण्यात आला. येरळवाडी येथे उमेदवार प्रतिनिधीची प्रशासकिय यंत्रणेशी शाब्दीक चकमक झाल्याने वाद निर्माण झाला. इतर सर्व ठिकाणी मतदान सुरळीत पार पडले. नायकाचीवाडी येथे सिद्धनाथ वॉर्ड नंबर एकमधील दहा नावे अचानक गायब झाल्याने एका गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत काही काळ मतदान बंद ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा विचारविनिमय करून त्या अडचणीवर मार्ग काढल्यानंतर संतप्त कार्यकर्ते शांत झाले.
0 Comments