सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
वेळे :
वाई तालुक्याच्या पूर्व भागातील ओझर्डे, बोपेगाव, गुळूंब या गावांत अज्ञात चोरट्यांच्या टोळीने भरदुपारी या गावातील बंद घरे फोडून १ लाख रुपये रोख व सोन्याचेदागिने असा मिळून २,६०,००० असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास करून भुईंज पोलिसांना तपासाचे आवाहन दिले आहे.
गुळूंब ता. वाई येथील दीपक रामचंद्र भिलारे, वय ४३ यांचे दिवसा बंद घराचे कटावणीच्या सहाय्याने अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश करून कपाटातील १५ ग्रँमची एकदाणी, १५ ग्रँमचा लक्ष्मीहार, ५ ग्रँमची कर्णफुले, लहान मुलींच्या ५ ग्रँमच्या रिंगा आणि रोख ८०००० रुपये असा एकूण २,६०,००० रुपयांचा मुद्देमाल या चोरट्यांनी लंपास करून पलायन केले आहे.तर बोपेगाव येथील (नाव समजू शकले नाही) अश्या बंद घराचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न करीत असतानाच शेजारी लोकांना कळल्यामुळे चोरट्यांचा तेथे चोरी करण्याचा प्रयत्न फसल्याने ते पळून गेले तर ओझर्डे ता. वाई येथील वडा या परिसरामध्ये राहणारे अनिल चंद्रराव पिसाळयांचे वाई वाठार रस्त्यावर घर असून त्या घरातील सर्वजण कामानिमित बाहेर गेल्याने या हि बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून लोखंडी कपाट उचकटून त्यातील १२ हजार रुपये रोख व लहान मुलांच्या १० सोन्याच्या अंगठ्या व गळ्यांतील दागिने असा एकूण १५००० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरांनी चोरून नेऊन पसार झाले आहेत. वाई तालुक्यामध्ये अज्ञात चोरट्यांची टोळी गेल्या २ ते ३ महिन्यापासून वावरत असून याच टोळीने ३ महिन्यापूर्वी वाई शहरालगत असलेल्या जेजुरीकर कॉलनीमध्ये भरदिवसा बंद असलेल्या ८ घरांची कटावणीच्या सहाय्याने कुलुपे तोडून लाखो रुपयांच्या मुद्देमालाची चोरी केली होती. त्याचा तपास अद्याप बाकी असतानाच वाई तालुक्याच्या पूर्व भागातील भुईंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुळूंब, बोपेगाव व ओझर्डे या गावातील भर दिवसा बंद घरे फोडल्याने नागरिकांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तरी पोलिसांनी या अज्ञात टोळींचा शोध घेवून नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणी जनतेतून होत आहे.

0 Comments